Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

New Car Launch : एसयूव्ही खरेदीदारांनो, थोडं थांबा ! बाजारात एन्ट्री करणार आहेत ‘या’ 3 शक्तिशाली नवीन कार; पहा यादी

बाजारात 3 नवीन कार लॉन्च होणार आहे. या एसयूव्ही कार आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी या कार घरी आणू शकता.

0

New Car Launch : देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी वाढत आहे. सध्या लोक कुटुंबासाठी एसयूव्ही कार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे देशात एसयूव्हीची बाजारपेठ वेगाने वाढत आहे.

अशा वेळी जर तुम्हीही नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही थोडं थांबा. कारण एकेकाळी केवळ साहसी वाहन किंवा युटिलिटी व्हेईकल म्हणून पाहिलेला हा विभाग आता फॅमिली कार म्हणून लोकांना आवडू लागला आहे. हे लक्षात घेऊन कंपन्यांनीही त्यांच्या वाहनांमध्ये बरेच बदल केले आहेत आणि आता या बदलांसह बाजारात 3 नवीन कार येणार आहेत.

अनेक कार निर्मण करणाऱ्या कंपन्या सतत त्यांच्या वाहनांमध्ये सुधारणा करत आहेत आणि नवीन मॉडेल बाजारात आणत आहेत. या कार्स त्याच्या कामगिरीसोबतच ते कुटुंबांसाठी खूप आरामदायक आहेत.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही 7 सीटर SUV शोधत असाल तर काही काळ थांबा, कारण 3 नवीन SUV बाजारात येणार आहेत. या तिन्ही गाड्या आधीच अस्तित्वात असल्या तरी कंपन्या यापैकी दोन कारचे फेसलिफ्ट मॉडेल आणि 1 कारचा नवीन प्रकार बाजारात सादर करणार आहेत.

यामध्ये Tata Safari, Harrier आणि Mahindra Bolero Neo Plus या कार आहेत. या तिन्ही एसयूव्ही त्यांच्या सेगमेंटमध्ये मजबूत स्थितीत आहेत आणि अनेक वर्षांपासून लोकांची पसंती आहेत. या तीन कारमध्ये तुम्हाला काय नवीन मिळणार आहे हे तुम्ही जाणून घ्या.

Tata Safari facelift

टाटा मोटर्सच्या सर्वात शक्तिशाली SUV सफारीच्या फेसलिफ्टेड मॉडेलची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता या वर्षीच्या सणासुदीच्या काळात या कारचे अनावरण केले जाऊ शकते.

तसे पाहिले तर सफारीच्या फेसलिफ्टमध्ये अनेक कॉस्मेटिक आणि यांत्रिक बदल पाहिले जाऊ शकतात. पेट्रोल इंजिनसह सफारी फेसलिफ्ट देखील दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

Tata Harrier

टाटा हॅरियरचे फेसलिफ्ट मॉडेल सफारीसोबत सणासुदीच्या काळातही लॉन्च केले जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला कारमध्ये इंजिनशी संबंधित कोणतेही बदल दिसणार नाहीत, कंपनी फक्त सध्या त्यात येणारे 2.0 लीटर डिझेल इंजिन देईल.

मात्र, अनेक नवीन फिचर्ससोबतच कारमध्ये अनेक कॉस्मेटिक बदलही पाहायला मिळणार आहेत. त्याबाबत कंपनीने अद्याप किंमत किंवा स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Bolero Neo Plus

कंपनी ऑक्टोबरमध्ये निओ प्लस लॉन्च करू शकते. असे मानले जाते की कारची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. या कारच्या पुढील आणि मागील डिझाइनमध्ये तुम्हाला बरेच बदल पाहायला मिळतात. यासोबतच तुम्हाला यामध्ये अनेक नवीन फीचर्स देखील पाहायला मिळणार आहेत.