Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Nexon EV खरेदी करताय? तर त्याआधी जाणून घ्या बॅटरी बदलण्यासाठी किती येईल खर्च, अन्यथा होईल पश्चाताप

Nexon EV कार खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी कारची बॅटरी बदलण्यासाठी किती खर्च येईल हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण ग्राहकांना बॅटरीचा खर्च पाहून अनेकदा धक्का बसू शकतो.

0

Nexon EV : देशातील ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या शानदार इलेक्ट्रिक एसयूव्ही आणि सेडान कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाटा मोटर्सचे सध्या देशातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक कार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. अलीकडेच टाटा मोटर्सकडून त्यांच्या Nexon EV चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे.

टाटा मोटर्सने Nexon EV फेसलिफ्ट कारच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये अनेक बदल केले आहेत. मात्र इलेक्ट्रिक कार काही अंतर चालवल्यानंतर त्याची बॅटरी खराब होते आणि ती पुन्हा नवीन बसवावी लागते.

तुम्हीही टाटाची Nexon EV फेसलिफ्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या कारची बॅटरी बदलण्यासाठी किती खर्च येत आहे ते जाणून घ्या. अन्यथा तुम्हालाही नंतर पश्चाताप होईल. Nexon EV कारच्या बॅटरीची किंमत जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

नवीन बॅटरीची किंमत किती असेल?

सोशल मीडियावर एका Nexon EV खरेदी केलेल्या ग्राहकाने पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की, त्याने 2 वर्षात 68,000 किलोमीटर कार चालवली त्यानंतर कारच्या रेंजमध्ये समस्या येऊ लागल्या. कालांतराने कारची रेंज खूप कमी झाली.

कारची बॅटरी १५ टक्के चार्जिंग असेल तेव्हा ती आपोआप धावायची थांबते. त्यानंतर कंपनीला याबाबत माहिती दिली. कंपनीकडून कारच्या बॅटरीवर 8 वर्षे किंवा 1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी देण्यात येत आहे.

कंपनीने मला कारची जुनी बॅटरी बदलून नवीन बॅटरी टाकून दिली. मात्र बॅटरीची किंमत पाहून धक्का बसला. Nexon EV बॅटरीची किंमत 4,47,489 रुपये आहे. नवीन Nexon EV फेसलिफ्ट कारची बॅटरी बदलण्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये खर्च येऊ शकतो.

Nexon EV ची रेंज किती आहे?

टाटा मोटर्सकडून Nexon EV कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कारमध्ये 30 kWh आणि 40.5kWh असे दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. हे दोन्ही बॅटरी पॅक 325 किमी आणि 465 किमी रेंज देण्यास सक्षम आहेत. एसी होम चार्जरने चार्ज होण्यासाठी 10.5 तास लागतात, तर डीसी फास्ट चार्जरने केवळ 56 मिनिते लागतात.

वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता

Nexon EV फेसलिफ्टमध्ये कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह मोठे 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 10.25-इंच पूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 9-स्पीकर JBL साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, क्रूझ कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, पुढील आणि मागील पार्किंग सेन्सर असे फीचर्स देण्यात आले आहेत.