Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Nexon EV Waiting Period : Nexon EV खरेदी करण्यासाठी करावी लागणार इतकी प्रतीक्षा! देते 465 किमी ड्रायव्हिंग रेंज

टाटा मोटर्सची Nexon EV फेसलिफ्ट खरेदी करण्याचा विचार असेल तर त्याआधी तुम्हाला कार खरेदीवरील प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. या कारच्या मागणीत वाढ झाल्याने प्रतीक्षा कालावधी देखील वाढला आहे.

0

Nexon EV Waiting Period : टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची Nexon EV फेसलिफ्ट एसयूव्ही कार लाँच केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हालाही टाटा मोटर्सची Nexon EV फेसलिफ्ट कार खरेदी करायची असेल तर त्याआधी तुम्हाला कारवरील प्रतीक्षा करावी लागणार आहे.

7 सप्टेंबर 2023 रोजी Nexon EV फेसलिफ्ट कार सादर केली असली तरीही ग्राहकांचा या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने कारचा प्रतीक्षा कालावधी देखील वाढला आहे.

Tata Nexon EV

टाटा मोटर्सने Nexon EV फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये ७ रंग पर्याय दिले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 14.74 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.94 लाख रुपयांपर्यंत जाते. महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक कारला Nexon EV फेसलिफ्टशी स्पर्धा करते.

Tata Nexon EV प्रतीक्षा कालावधी

टाटा मोटर्स Nexon EV फेसलिफ्ट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ही कार बुक केल्यापासून 6 ते 8 आठवडे प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र डिलरशिप, रंग पर्याय आणि व्हेरियंटनुसार कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जवळच्या टाटा डिलरशिपला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.

Tata Nexon EV रेंज, बॅटरी पॅक

टाटा मोटर्सकडून त्यांच्या इलेक्ट्रिक कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक पर्याय दिला जात आहे. Nexon EV फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये टाटा मोटर्सने दोन बॅटरी पॅक पर्याय दिले आहेत. पहिला 30 kWh बॅटरी पॅक आणि दुसरा 40.5kWh बॅटरी पॅकचा पर्याय उपलब्ध आहे.

30 kWh बॅटरी पॅक पर्याय 325 किमी रेंज देण्यास सक्षम आहे तर 40.5kWh बॅटरी पॅक 465 किमी पर्याय देण्यास सक्षम आहे. ही कार 8.9 सेकंदात 0-100 किमी वेग पकडण्यास सक्षम आहे.

टाटा मोटर्सचे सध्या देशातील ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार सेगमेंट पर्यायात मजबूत पकड असल्याचे दिसत आहे. कारण टाटा मोटर्सच्या अनेक इलेक्ट्रिक कार सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

आगामी काळात टाटा मोटर्स आणखी नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. २०२४ मध्ये टाटा मोटर्सच्या नवीन पंच EV, हॅरियर EV आणि Curvv EV यासह इतर इलेक्ट्रिक कार लाँच केल्या जाणार आहेत.