Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Nexon Facelift Ev Vs XUV400 EV : नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट की XUV400 ईव्ही? कोणती आहे स्वस्त आणि सर्वाधिक धावणारी कार, पहा किमतीसह सर्वकाही…

महिंद्राची XUV400 ईव्ही आणि टाटाची नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट कार खरेदी करण्याअगोदर कारचे फीचर्स आणि किंमत याबद्दल माहिती आवश्यक आहे. तसेच कोणती कार ड्रायव्हिंगसाठी बेस्ट आहे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

0

Nexon Facelift Ev Vs XUV400 EV : टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट अलीकडेच लॉन्च केली आहे. या एसयूव्ही कारमध्ये टाटाकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच डिझाईन देखील आकर्षक बनवण्यात आले आहे.

Nexon EV ही त्याच्या सेगमेंटमध्ये आधीच नंबर-1 इलेक्ट्रिक SUV कार आहे. आता टाटाच्या नवीन इलेक्ट्रिक कार Nexon च्या मागणीमध्ये वाढ होऊ शकते. टाटाची ही कार Mahindra XUV400 ईव्हीशी स्पर्धा करते.

तुम्हीही टाटा Nexon फेसलिफ्ट ईव्ही किंवा Mahindra XUV400 ईव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला दोन्ही इलेक्ट्रिक कारच्या फीचर्स, रेंज, बॅटरी पॅक आणि किमतीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

टाटा Nexon फेसलिफ्ट ईव्ही

टाटा Nexon फेसलिफ्ट ईव्ही एसयूव्ही कारमध्ये नवीन दोन स्पोक स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहेत. तसेच पूर्णपणे नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. 12.3 इंचाची मोठी स्क्रीन, 360 डिग्री कॅमेरा, अनेक कनेक्टेड कार फीचर्स, व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

टाटा Nexon फेसलिफ्ट बॅटरी आणि रेंज

टाटा Nexon फेसलिफ्ट कारमध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. पहिला 30 kWh आणि दुसरा 40.5 kWh असे बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. पहिला बॅटरी पॅक सिंगल चार्जमध्ये ३२५ किमी रेंज देते तर दुसरा बॅटरी पॅक ४६५ किमी रेंज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर २१५ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

टाटा Nexon फेसलिफ्ट किंमत

टाटा Nexon फेसलिफ्ट कारची बॅटरी पूर्णपणे चार्जिंग होण्यासाठी ५६ मिनिटांचा कालावधी लागतो. या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ६ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. या कारची किंमत १४.७५ लाख ठेवण्यात आली आहे.

Mahindra XUV400 ईव्ही बॅटरी पॅक आणि रेंज

महिंद्रा XUV400 ईव्ही या कारमध्ये 39.4 kWh आणि 34.5 kWh असे दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत. 34.5 kWh बॅटरी पॅक असलेली कार सिंगल चार्जमध्ये ३७५ किमी रेंज देते तर 39.4 kWh बॅटरी पॅक असलेली कार ४५६ किमी रेंज देते. या इलेक्ट्रिक कारची मोटर ३१० Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Mahindra XUV400 ईव्ही किंमत

Mahindra XUV400 इलेक्ट्रिक कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ६ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. ही कार पूर्णपणे चार्जिंग होण्यासाठी ५० मिनिटांचा कालावधी लागतो. या कारची एक्स शोरूम किंमत १५.९९ लाख रुपये आहे.