Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Nexon Facelift vs XUV300 कोणती आहे तुमच्यासाठी बेस्ट SUV? पहा किंमत आणि फीचर्स

Nexon Facelift आणि XUV300 एसयूव्ही कार खरेदी करताना गोंधळात पडला असाल तर काळजी करू नका. या कारच्या किमती आणि वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या.

0

Nexon Facelift vs XUV300 : देशात एसयूव्ही कार खरेदीची ग्राहकांमध्ये क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हीही नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टाटा आणि महिंद्राच्या एसयूव्ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

नवीन एसयूव्ही कार खरेदी करताना Nexon Facelift आणि XUV300 या दोन एसयूव्ही खरेदीसाठी गोंधळात असाल तर काळजी करू नका. तुमच्यासाठी कोणती एसयूव्ही कार बेस्ट पर्याय आहे ते जाणून घ्या.

Nexon Facelift किंमत

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची Nexon Facelift एसयूव्ही कार सादर केली आहे. तसेच देशातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही कार देखील ठरली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.50 लाख रुपये आहे.

महिंद्रा XUV300

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची XUV300 एसयूव्ही कार देखील कमी बजेटमध्ये उत्तम एसयूव्ही पर्याय आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.76 लाख रुपये आहे. Nexon कारपेक्षा XUV300 एसयूव्ही कार सर्वोत्तम पर्याय आहे.

Nexon Facelift Vs XUV300 इंजिन

Nexon Facelift एसयूव्ही कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. कारचे इंजिन 118 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. XUV300 एसयूव्ही कारमध्ये 1197 cc 3 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे.

दोन्ही कारच्या इंजिनला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. Nexon Facelift एसयूव्ही कारमध्ये 382 लीटर बूट स्पेस आणि 257 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे.

Nexon Facelift Vs XUV300 वैशिष्ट्ये

Nexon Facelift एसयूव्ही कारमध्ये 10.25 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, नवीन एपी पॅनल, ऍपल कार प्लेसह अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

महिंद्राच्या XUV300 एसयूव्ही कारमध्ये देखील दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेसह सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सिंगल-पेन सनरूफ, क्रूझ कंट्रोल ऑटो एसी आणि कनेक्टेड कार टेक अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.