Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Next-Gen Maruti Dzire : मारुती स्विफ्ट फेसलिफ्टपूर्वी लॉन्च होणार लोकप्रिय डिझायरचे स्टायलिश मॉडेल, होणार मोठे बदल…

मारुती सुझुकीकडून लवकरच त्यांच्या स्विफ्ट आणि डिझायर या सेडान कारचे नवीन मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. स्विफ्ट कारपूर्वी आता डिझायर कारचे नवीन मॉडेल लॉन्च केले जाऊ शकते.

0

Next-Gen Maruti Dzire : मारुती सुझुकीकडून त्यांच्या अनेक कार पुन्हा एकदा नवीन व्हर्जनमध्ये सादर केल्या जाणार आहेत. सर्वाधिक लोकप्रिय स्विफ्ट सेडान कार देखील नवीन मॉडेलमध्ये लवकरच लॉन्च होणार आहे मात्र त्यापूर्वी मारुती डिझायरचे नवीन मॉडेल सादर केले जाऊ शकते.

मारुती सुझुकीच्या स्विफ्ट आणि डिझायर या सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मारुतीकडून स्विफ्ट कारचे नवीन मॉडेल लॉन्च करण्यापूर्वी डिझायरचे नवीन मॉडेल लॉन्च केले जाणार आहे.

नेक्स्ट-Gen मारुती डिझायर लॉन्च

मारुती सुझुकीकडून 2017 डिझायर कारचे नवीन मॉडेल सादर केले होते जे सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच सध्या बाजारात उपलब्ध असलेली स्विफ्ट कार 2018 साली बाजारात सादर करण्यात आली होती.

आता मारुतीकडून डिझायर सेडान कारचे नवीन मॉडेल बाजारात आणले जाऊ शकते. त्यामुळे जुन्या डिझायर कारमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन मिळू शकते. मारुती सुझुकीकडून जून 2024 पर्यंत डिझायर सेडान कार भारतात लॉन्च केली जाऊ शकते. तसेच स्विफ्ट कारचे नवीन मॉडेल 2025 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते.

25 लाख मारुती डिझायर सेडान कार विकल्या

मारुती सुझुकीकडून त्यांच्या डिझायर कारचे 2008 पासून एकूण 25 लाख युनिट्स विकली आहेत. डिझायर कार 2008 मध्ये पहिल्यांदा ऑटो बाजारात सादर करण्यात आली होती. 2012-13 या आर्थिक वर्षात 5 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला होता. 2015-16 या वर्षांमध्ये 10 लाख पेक्षा जास्त कार विक्री झाल्या होत्या. 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 25 लाख कार विक्रीचा टप्पा पार झाला आहे.

इंजिन

सध्या बाजारात उपलब्ध असलेली डिझायर कार 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 88 hp पीक पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा AMT गिअरबॉक्स पर्याय दिला जात आहे. या कारचे सीएनजी मॉडेल देखील उपलब्ध आहे जे 76 hp पॉवर आणि 98 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. डिझायर कारची एक्स शोरूम किंमत 6.51 लाख रुपये ते 9.39 लाख रुपये आहे.