Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Nissan Magnite Discount : Brezza, Sonet ला टक्कर देणाऱ्या या शानदार SUV वर मिळतेय 87000 रुपयांची बंपर सूट, पहा ऑफर

नवीन कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण एका शानदार एसयूव्ही कारवर 87000 रुपयांची बंपर सूट देण्यात येत आहे.

0

Nissan Magnite Discount : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण एका शानदार एसयूव्ही कारवर मोठी सूट दिली जात आहे. तुम्हीही या महिन्यात ही एसयूव्ही कार खरेदी करून 87000 रुपयांची बंपर सूट मिळवू शकता.

Nissan Magnite एसयूव्ही कारवर या महिन्यात 87000 रुपयांची सवलत देण्यात आहे. या कारवर देण्यात येणाऱ्या ऑफरमध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट सवलत आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.

Nissan Magnite एसयूव्ही कार 5 व्हेरियंटमध्ये उपलब्ध

Nissan कार कंपनीकडून Magnite एसयूव्ही कार 5 व्हेरियंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारमध्ये 999 सीसीचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही SUV Kia Sonet, Hyundai Venue, Maruti Suzuki Brezza आणि Tata Nexon शी स्पर्धा करते. कारमध्ये टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे.

कारमध्ये 8.0-इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

कारमध्ये 8.0-इंचाची एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. कारमधील इंजिन ९८.६३ पीएस पॉवर आणि १६० एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ऑफर करण्यात आली आहे. Magnite एसयूव्ही कार 20 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Nissan Magnite मध्ये 336 लीटर बूट स्पेस आहे

Magnite एसयूव्ही कारमध्ये ADAS, एअरबॅग्ज यांसारख्या सुरक्षिततेसाठी उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच कारमध्ये 336 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे. कारला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.02 लाख रुपये आहे.

Magnite एसयूव्ही कार तीन ड्युअल टोन आणि पाच मोनोटोन रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. 360-डिग्री कॅमेरा, हिल-स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

कारमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स कारच्या प्रीमियम ट्रिम्स, XV आणि XV मध्ये वायरलेस फोन चार्जर, एअर प्युरिफायर, JBL स्पीकर, अॅम्बियंट लाइटिंग यांसारखी मानक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कार 5-स्पीड गिअरबॉक्ससह ऑफर करण्यात आली आहे.