Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Nissan Magnite Kuro : Nexon आणि Seltos चे टेन्शन वाढले! Nissan या दिवशी लॉन्च करणार स्टायलिश SUV, पहा फीचर्स

ऑटो मार्केटमध्ये येत्या काळात अनेक कार लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी शक्तिशाली एसयूव्ही कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे. Nissan कार कंपनी देखील त्यांची नवीन एसयूव्ही कार सादर करणार आहे.

0

Nissan Magnite Kuro : देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. या काळात अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. त्यामुळे देशातील कार कंपन्यांकडून त्यांच्या शानदार एसयूव्ही कार सादर केल्या जाणार आहेत. या महिन्यापासून दिवाळीपर्यंतचा काळ ऑटो क्षेत्रासाठी खास ठरणार आहे.

Nissan कार उत्पादक कंपनीकडून देखील नवीन एसयूव्ही कार लॉन्च करण्यासाठी कंबर कसली आहे. 12 ऑक्टोबर रोजी Nissan कार कंपनी Magnite Kuro Edition आणि Nissan Magnite EZ-Shift कार लॉन्च करणार आहे.

ही कार काळ्या रंगात उपलब्ध असेल

Nissan कार उत्पादक कंपनीकडून त्यांची नवीन Magnite कारचे मॉडेल काळ्या रंगात सादर केले जाणार आहे. या कारमध्ये 1.0 लीटर पॉवरफुल पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. तसेच नवीन रेड ब्रेक कॅलिपर देखील मिळतील. Nissan कार कंपनीकडून नवीन कारच्या बंपरमध्ये सिल्व्हर इन्सर्ट देण्यात आला आहे.

कारमध्ये वायरलेस चार्जर आणि हवामान नियंत्रण

Nissan Magnite Kuro या नवीन एसयूव्ही कारमध्ये अनेक दहमकेदार फीचर्स दिले जाणार आहेत. ब्लॅक रूफ लाइनर, ब्लॅक सन व्हिझर आणि ब्लॅक डोअर, पॅकेज थीम फ्लोअर मॅट्ससह मोठे IRVM, वायरलेस चार्जर, क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशी प्रगत वैशिष्ट्ये कारमध्ये दिली जाणार आहेत.

डायमंड-कट अलॉय व्हील आणि एलईडी हेडलॅम्प

Magnite Kuro या नवीन एसयूव्ही कारमध्ये ड्रायव्हरचे सीट अॅडजस्टमेंट फीचर, डायमंड-कट अलॉय व्हील आणि एलईडी हेडलॅम्प देण्यात येणार आहेत. Nissan Magnite EZ-Shift ची किंमत लवकरच कंपनीकडून जाहीर केली जाईल. Nissan Magnite एसयूव्ही कारला आणखी स्टायलिश बनवण्यात आले आहे.

कारमध्ये 5 स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन आहे

सध्या ऑटो बाजारात मॅग्नाइट एसयूव्ही कारचे ऑटोमॅटिक 1.0-लिटर पेट्रोल व्हर्जन उपलब्ध आहे. कारचे हे इंजिन 71 bhp चा पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5 स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. XE, XL, XV एक्झिक्युटिव्ह आणि XV या व्हेरियंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. ही कार Kia Seltos आणि Tata Nexon एसयूव्ही कारशी स्पर्धा करते.

५ सीटर कार

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या निसान मॅग्नाइट एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. ही कार वेगेवेगळ्या व्हेरियंटमध्ये 17.4 ते 19.34 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. ही ५ सीटर कार तुमच्या फॅमिलीसाठी उत्तम कार आहे.