Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Nissan Magnite SUV : पंच आणि ब्रेझाचे टेन्शन वाढणार! या जबरदस्त SUV ला मिळणार नवीन शक्तिशाली इंजिन, किंमत फक्त 6 लाख

कमी बजेट एसयूव्ही कार खरेदीचा विचार असेल तर बाजारात ६ लाख रुपयांच्या किमतीत शानदार एसयूव्ही कार उपलब्ध आहे. या कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Nissan Magnite SUV : सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये एकापेक्षा एक दमदार एसयूव्ही कार लॉन्च होत आहेत. तसेच एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून त्यांच्या शानदार एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत.

निसान कार उत्पादक कंपनीची मॅग्नाइट एसयूव्ही देखील अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे. आता कंपनीकडून मॅग्नाइट एसयूव्ही कारमध्ये नवीन इंजिन पर्याय जोडला जाणार आहे. आता या कारमध्ये 1.0-लीटर NA पेट्रोल इंजिनसह AMT गिअरबॉक्सचा पर्याय देखील दिला जाणार आहे. मॅग्नाइट कार 2020 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे.

निसान मॅग्नाइटचे वर्तमान इंजिन

 

निसान मॅग्नाइट एसयूव्ही कारमध्ये सध्या 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे जे 100hp पॉवर आणि 160Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन पर्याय देखील देण्यात आला आहे.

हे इंजिन 71hp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. आता कारमध्ये नवीन 1.0-लीटर NA पेट्रोल इंजिन AMT गिअरबॉक्ससह देण्यात येणार आहे.

मॅग्नाइट किंमत

कमी बजेट ग्राहकांसाठी मॅग्नाइट एसयूव्ही कार सर्वोत्तम पर्याय आहे. कारण ही कार अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.02 लाख रुपये आहे.

निसान मॅग्नाइट ब्लॅक एडिशन

निसान ऑटो कंपनी त्यांची नवीन मॅग्नाइट ब्लॅक एडिशन कार सादर करणार आहे. या कारमध्ये सनरूफ व्यतिरिक्त, यात वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह 8-इंच टचस्क्रीन आणि अगदी 360-डिग्री कॅमेरासह अनेक वैशिष्ट्ये मिळणार आहेत.

मॅग्नाइट बाजारातील या कारशी स्पर्धा करते

मॅग्नाइट कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय ऑटो मार्केटमधील रेनॉल्ट किगर, टाटा पंच, ह्युंदाई एक्ससेंट आणि सिट्रोएन C3 सारख्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीशी स्पर्धा करते. तसेच किमतीच्या बाबतीत ही कार टाटा Nexon, महिंद्रा XUV300, मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, मारुती सुझुकी Fronx या करशी स्पर्धा करते.