Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Nissan Upcoming 7 Seater Car : Ertiga ची होणार गेम ! निसान बाजारात आणणार परवडणारी 7 सीटर कार, असणार इतकी किंमत

0

Nissan Upcoming 7 Seater Car : देशातील ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही कारसोबतच MPV कारच्या मागणीत देखील प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन MPV कार बाजारात सादर करत आहेत.

मारुती सुझुकीच्या एर्टिगा MPV कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता मारुतीच्या एर्टिगाला टक्कर देण्यासाठी निसान कार उत्पादक कंपनी सज्ज झाल्याचे दिसत आहे. कारण निसान आता त्यांची नवीन 7 सीटर कार बाजारात लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

निसान कार निर्मात्या कंपनीकडून त्यांची 7 सीटर कार यावर्षी भारतीय ऑटो मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते. या 7 सीटर कारची एक्स शोरूम किंमत 10 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.

7  सीटर कारला ग्राहकांची प्रचंड मागणी

मोठ्या फॅमिलीसाठी नवीन कार खरेदी करताना अनेकजण 7 सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या 7 सीटर कार बाजारात उपलब्ध आहेत मात्र त्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकांना त्या खरेदी करता येत नाहीत.

पण मारुतीसह अनेक कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या स्वस्त 7 सीटर कार बाजारात सादर केल्या आहेत. अशा स्वस्त 7 सीटर कारला चांगली मागणी असल्याचे देखील दिसत आहे.

Nissan कार कंपनीकडून 7 सीटर कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी त्यांची नवीन 7 सीटर कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. Nissan ची 7 सीटर कार मॅग्नाइट किंवा रेनॉल्ट ट्रायबर कारवर आधारित असू शकते.

संभाव्य वैशिष्ट्ये आणि इंजिन

निसानची नवीन MPV कार CMF-A प्लॅटफॉर्मवर तयार केली जाण्याची शक्यता आहे. कारमध्ये 1.0 लीटर 3 सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0 लीटर 3 सिलेंडर टर्बो-चार्ज केलेले पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते.

मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह नवीन MPV कार लॉन्च केली जाऊ शकते. निसानची नवीन MPV कार परिपूर्ण वैशिष्ट्यांनी सुसज्ज असू शकते. तसेच कारची किंमत देखील कमी असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळण्याची शक्यता आहे.