Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Nissan Upcoming Cars : निसान लवकरच लॉन्च करणार ३ जबरदस्त SUV कार, असणार ही खास प्रीमियम वैशिष्ट्ये

निसान कार कंपनीकडून पुढील वर्षी त्यांच्या ३ जबरदस्त एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. या कारमध्ये शक्तिशाली इंजिनसह प्रीमियम फीचर्स दिले जाणार आहेत.

0

Nissan Upcoming Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून आगामी काळात त्यांच्या शानदार कार लॉन्च केल्या जाणारा आहेत. त्यामुळे पुढील काळ ऑटो क्षेत्रासाठी खास ठरणार आहे.

निसान कार उत्पादक कंपनी लवकरच भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये त्यांच्या ३ जबरदस्त कार लॉन्च करणार आहे. X-Trail, Qashqai आणि Juke या तीन कार लवकरच भारतीय रस्त्यावर धावताना पाहायला मिळू शकतात.

निसान एक्स-ट्रेल एसयूव्ही

एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता निसान त्यांची एक्स-ट्रेल एसयूव्ही कार भारतात लवकरच लॉन्च करेल. CMF-C क्रॉसओव्हर प्लॅटफॉर्मवर ही कार तयार केली जाईल.

कारमध्ये 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. 4 व्हील ड्राइव्ह पर्यायामध्ये कार सादर केली जाईल. Jeep Meridian, Mahindra Alturas G4, MG Gloster आणि Skoda Kodiaq सारख्या एसयूव्ही कारशी ही कार स्पर्धा करेल.

Nissan Juke SUV

Nissan कार कंपनीकडून पुढील वर्षी Juke SUV कार लाँच केली जाईल. या एसयूव्ही कारमध्ये 1.0 लिटर 3 सिलेंडर इंजिन दिले जाईल. कारचे इंजिन 115 bhp पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.

Juke SUV कारचे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असू शकते. Juke एसयूव्ही कारमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, लाईव्ह ट्रॅफिक नेव्हिगेशन, बोस ऑडिओ सिस्टीम अशी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. ही एसयूव्ही 10.4 सेकंदात 0-100 kmph वेग पकडण्यास सक्षम असेल.

Nissan Qashqai SUV

Nissan कार कंपनीकडून त्यांची Qashqai SUV कार देखील आगामी काळात लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन Xtronic CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असू शकते.

कारमध्ये सौम्य हायब्रीड इंजिन देखील पाहायला मिळेल. हे इंजिन 140kW ची इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले असेल. Qashqai SUV कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.8-इंच हेड अप डिस्प्ले आणि व्हॉईस कमांड अशी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.