Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Off Roader SUVs In India : डोंगरदऱ्यात घ्या ऑफ-रोडिंग ड्रायव्हिंगचा आनंद! या आहेत ऑफ-रोडिंग SUVs, किंमत फक्त

तुम्हालाही ऑफ रोडींगसाठी शक्तिशाली एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात महिंद्रा ते मारुतीपर्यंतच्या ऑफ-रोडिंग SUV कार उपलब्ध आहेत.

0

Off Roader SUVs In India : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या शानदार कार सादर करत आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हालाही ऑफ-रोडिंग ड्रायव्हिंगचा आनंद घेईचा असेल तर बाजारात अनेक ऑफ-रोडिंग SUVs उपलब्ध आहेत.

तुम्हीही नवीन ऑफ-रोडिंग SUVs खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी मारुती, महिंद्रा आणि फोर्स कंपनीच्या ऑफ रोडींग एसयूव्ही उपलब्ध आहेत. या एसयूव्हीच्या किमती देखील कमी आहेत.

मारुती जिमनी

मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांची पहिली ऑफ रोडींग एसयूव्ही कार जिमनी अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. ही कार महिंद्राच्या थार एसयूव्ही कारला टक्कर देते.

मारुती जिमनी एसयूव्हीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.05 लाख रुपये आहे. कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि साइड आणि कर्टन एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड कंट्रोलसह ESP, हिल डिसेंट कंट्रोल, ब्रेक असिस्ट फंक्शन, साइड-इम्पॅक्ट डोअर बीम, सीटबेल्ट प्री-टेन्शनर देण्यात आली आहेत.

तसेच कारमध्ये लॉकिंग रिट्रॅक्टर सीटबेल्ट, इंजिन इमोबिलायझर, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, रीअरव्ह्यू कॅमेरा असे फीचर्स देखील कारमध्ये उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी मारुती जिमनी ऑफ रोडींग एसयूव्ही कार उत्तम पर्याय आहे.

महिंद्रा थार

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही कार थारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. थारची ग्राहकांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. कारमध्ये ORVM, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ऑल-टेरेन टायर्ससह 18-इंच अलॉय व्हील्स अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

थार एसयूव्ही कारमध्ये 1.5-लिटर टर्बो डिझेल इंजिन दिले आहे जे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.98 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16.94 लाख रुपये आहे.

फोर्स गुरखा

तुमचे बजेट १५ लाखांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला ऑफ रोडींग एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात गुरखा एसयूव्ही कारचा पर्याय उपलब्ध आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.10 लाख रुपये आहे.

कारमध्ये LED DRL सह हेडलाइट्स आणि टेललाइट्स देण्यात आल्या आहेत. फोर्स गुरखा एसयूव्ही कारमध्ये फ्रंट टर्न इंडिकेटर, ऑफ-रोड-बायस्ड टायर, डोअर-माउंट केलेले स्पेअर व्हील मिळते.