Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Ola s1x Plus : OLA ची s1x Plus इलेक्ट्रिक स्कूटर इतक्या रुपयांनी झाली स्वस्त ! पहा एका क्लिकवर नवीन किंमत

नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे. Ola ची जबरदस्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्त झाली आहे.

0

Ola s1x Plus : देशात महागाई गगनाला भिडली आहे. अशा काळात पेट्रोलच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलवरील स्कूटर वापरणे अनेकांना न परवडण्यासारखे झाले आहे. तुम्हालाही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे.

देशातील सर्वात मोठ्या Ola इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या स्कूटरच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे. त्यामुळे Ola s1x Plus इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत काही हजारांनी कमी झाली आहे.

Ola इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून त्यांच्या स्कूटरवर या डिसेंबर २०२३ मध्ये आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. कंपनीकडून त्यांच्या s1x Plus इलेक्ट्रिक स्कूटर ही ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन तुम्ही हजारोंची बचत करू शकता. “डिसेंबर टू रिमेंबर” अशी ऑफर Ola कडून देण्यात येत आहे.

Ola इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून त्यांच्या S1 इलेक्ट्रिक स्कूटरवर 20,000 रुपयांची आकर्षक सूट दिली जात आहे. Ola कडून ही ऑफर ३१ डिसेंबरपर्यंतच दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही स्कूटरच्या एक्स शोरूम किमतीमध्ये २० हजारांची कपात करून ही स्कूटर घरी आणू शकता. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1,09,999 रुपये होती आता ती 89,999 रुपये झाली आहे.

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3KWh लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 151 किमी रायडींग रेंज देण्यास सक्षम आहे.

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीकडून 6 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 3.3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. स्कूटरचा ताशी टॉप स्पीड 90 किमी आहे.

Ola इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या कंपनीने नोव्हेंबर २०२३ मधील स्कूटर विक्रीचा अहवाल सादर केला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये कंपनीने 30,000 युनिट्सची रेकॉर्ड ब्रेक विक्री केली आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याकडे वळत आहेत.

तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत असतील तर काळजी करू नका. कारण तुम्ही Ola ची ही इलेक्ट्रिक स्कूटर 2,099 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करू शकता. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी देण्यात आलेल्या कर्जावर तुमच्याकडून 6.99 टक्के वार्षिक व्याज आकारले जाईल.