Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Cars Sales : भारी फीचर्स आणि सेफ्टी देऊनही लोक टाटांच्या कार घेईनात ! Safari असो वा Harrier सगळेच झाले फेल…

0

भारतात सर्वाधिक कार विकण्याच्या बाबतीत टाटा मोटर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्‍टोबर 2023 मध्येही टाटा मोटर्स तिसऱ्या क्रमांकावर राहिली. गेल्या वर्षी याच कालावधीत ४५,२२० कारच्या तुलनेत ४८,३४३ कार विकल्या गेल्या.

कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 7% वाढ झाली आहे. पण, वार्षिक आधारावर त्याच्या 4 कारच्या विक्रीत घट झाली. टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा हॅरियर आणि टाटा सफारी या कार आहेत.

हॅरियर आणि सफारी

Harrier And Safari
Harrier And Safari

टाटाच्या प्रमुख एसयूव्ही – हॅरियर आणि सफारीच्या विक्रीत घट झाली आहे. वार्षिक आधारावर त्यांची विक्री अनुक्रमे 31 टक्के आणि 23 टक्क्यांनी घसरली. टाटाने ऑक्टोबर 2023 मध्ये हॅरियरच्या एकूण 1,896 युनिट्सची विक्री केली तर गेल्या वर्षी (2022) ऑक्टोबरमध्ये हा आकडा 2,762 युनिट्स होता.

सफारीबद्दल बोलायचे झाले तर, टाटा ने गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये सफारीच्या एकूण 1,340 युनिट्सची विक्री केली आहे, तर ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण 1,751 युनिट्सची विक्री झाली आहे. याचा अर्थ विक्रीत 23 टक्क्यांनी घट झाली आहे.

टाटा टियागो

Tata Tiago
Tata Tiago

टाटा मोटर्सने ऑक्टोबर 2023 मध्ये टियागोच्या 5,356 युनिट्सची विक्री केली तर ऑक्टोबर 2022 मध्ये 7,187 युनिट्सची विक्री झाली. याचा अर्थ वार्षिक आधारावर विक्री 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. एवढेच नाही तर सप्टेंबर 2023 मध्ये विकल्या गेलेल्या 6,789 युनिटच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये त्याची विक्री 21 टक्क्यांनी कमी झाली.

टाटा टिगोर

Tata Tigor
Tata Tigor

टाटा मोटर्सच्या एकमेव सेडान – टिगोरच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. त्याची विक्री वार्षिक आधारावर 61 टक्क्यांनी कमी झाली आहे. कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये टिगोरच्या एकूण 1,563 युनिट्सची विक्री केली आहे. तर ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण 4001 युनिट्सची विक्री झाली.