Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Petrol 7 Seater Cars : मोठ्या फॅमिलीसाठी बेस्ट आहेत या आलिशान पेट्रोल 7 सीटर! पहा किंमत

तुम्हालाही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी आलिशान पेट्रोल ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर टोयोटा, महिंद्रा आणि मारुतीच्या उत्तम कार ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

0

Petrol 7 Seater Cars : मोठ्या फॅमिलीसाठी नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. तसेच सध्या ७ सीटर MPV कारच्या मागणीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. बाजारात टोयोटा ते मारुतीपर्यंतच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत.

देशातील ७ सीटर कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायासह सादर करण्यात आल्या आहेत. तुम्हाला पेट्रोलवरील बेस्ट ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात अनेक लक्झरी फीचर्स कार उपलब्ध आहेत.

महिंद्रा XUV700

महिंद्राची शक्तिशाली इंजिन असलेली बेस्ट पेट्रोल ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी महिंद्रा XUV700 कार उत्तम पर्याय आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.03 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 26.57 लाख रुपये आहे.

टोयोटा फॉर्च्युनर

लक्झरी फीचर्स असलेली आलिशान पेट्रोल ७ सीटर कार शोधत असाल तर फॉर्च्युनर MPV कार उत्तम पर्याय आहे. टोयोटाची ही सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. या कारमध्ये 2694 cc पेट्रोल इंजिन दिले आहे जे 162 hp आणि 245 Nm पीक टॉर्क करण्यास सक्षम आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 33.43 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 51.44 लाख रुपये आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस

टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल ७ सीटर कार देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स दिले गेले आहेत. 172 hp पॉवर आणि 205 Nm पीक टॉर्क जनरेट करणारे पेट्रोल इंजिन कारमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.67 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 30.26 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी इनव्हिक्टो

मारुती सुझुकी कार कंपनीची इनव्हिक्टो MPV कार देखील पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही ७ सीटर कार Innova Hycross वर आधारित आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 24.82 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 28.42 लाख रुपये आहे.