Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Popular 7 Seater Cars : राजकीय नेते ते सेलेब्रिटीपर्यंत लोकप्रिय आहेत या लक्झरी ७ सीटर कार, पहा किंमत

मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर बाजारात तुमच्यासाठी अनेक कंपन्यांच्या लोकप्रिय ७ सीटर कार उपलब्ध आहेत. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Popular 7 Seater Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या आलिशान ७ सीटर कार उपलब्ध आहेत. या कारला सर्वसामान्यच नाही तर राजकीय पुढाऱ्यांपासून ते सेलेब्रिटींपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार सर्वाधिक मोठ्या प्रमाणात निवडणुकांमध्ये देखील वापरल्या जातात.

तुम्हालाही देशातील लोकप्रिय ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर टोयोटा ते महिंद्रापर्यंतच्या अनेक कार बाजारात उपलब्ध आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच कारमध्ये आलिशान फीचर्स देण्यात आले आहेत.

टोयोटा फॉर्च्युनर

टोयोटा फॉर्च्युनर ही सर्वाधिक लोकप्रिय असलेली आलिशान ७ सीटर कार आहे. या कारला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकी दरम्यान टोयोटा फॉर्च्युनर सर्वाधिक वापरली जाणारी कार आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 33.43 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 51.44 लाख रुपये आहे. टोयोटा फॉर्च्युनर राजकारण्यांची आवडती कार आहे.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा

टोयोटा कार उत्पादक कंपनीची इनोव्हा क्रिस्टा ७ सीटर कार देखील अधिक लोकप्रिय कार आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ७ सीटर कारमध्ये आलिशान लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत.

मोठ्या फॅमिलीसाठी ही एक उत्तम कार आहे. कार चार व्हेरियंटमध्ये विकली जात आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 26.05 लाख रुपये आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस

टोयोटाने त्यांच्या Innova कारचे नवीन व्हेरियंट बाजारात सादर केले आहे. Innova Hycross ७ सीटर कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहे. कारमध्ये प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 19.67 लाख रुपये आहे.

Mahindra Scorpio-N

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक शक्तिशाली ७ सीटर कार भारतात सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. Scorpio-N ७ सीटर कार तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम पर्याय आहे.

कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.26 लाख रुपये आहे. कारमध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. तुम्हीही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी Scorpio-N ७ सीटर कारचा पर्याय निवडू शकता.