Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Popular Sedan Cars In India : 6 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत येतात या 4 आहेत लोकप्रिय सेडान कार ! मिळतात लक्झरी फीचर्स

0

Popular Sedan Cars In India : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. मात्र काही कंपन्यांच्या सेडान कारला आजही मोठा प्रतिसाद मिळत आहे. तुम्हालाही देशातील लोकप्रिय सेडान कार खरेदी करायची असेल होंडा ते मारुतीपर्यंतच्या सेडान कार उपलब्ध आहेत.

होंडा सिटी

होंडा कार उत्पादक कंपनीची सिटी सेडान कार देशातील लोकप्रिय सेडान कारपैकी एक आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार पेट्रोल व्हेरियंटमध्ये 17.4kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. सिटी सेडान कारमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सनरूफ, लेदर इंटीरियर आणि एलईडी हेडलाइट्स, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो एसी आणि पॉवर-फोल्डिंग ORVM सारखी अनेक मानक वैशिष्ट्ये दिली आहेत. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.5 लाख रुपये आहे.

मारुती डिझायर

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची डिझायर सेडान कार देखील लोकप्रिय कार आहे. आजही या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये 1.2 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि पर्यायी 5 स्पीड एमटी गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह सात इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4.2-इंच मल्टी-कलर MID, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एलईडी हेडलाइट्स, ऑटो-फोल्डिंग ORVM, पुश-बटण इंजिन स्टार्ट/स्टॉप आणि ऑटो रियर असे फीचर्स दिले आहेत. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.24 लाख रुपये आहे.

ह्युंदाई Verna

ह्युंदाई मोटर्सच्या Verna सेडान कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Verna सेडान कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 115 PS पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देखील दिले आहे. कारची एक्स शोरूम किंमत 9.41 लाख रुपये आहे.

होंडा अमेझ

होंडा अमेझ सेडान कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.63 लाख रुपये आहे. अमेझ देखील लोकप्रिय सेडान कारपैकी एक आहे. या कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.

1.5 लीटर डिझेल इंजिन आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये 15 इंच ड्युअल-टोन अॅलॉय व्हील, सात इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स अशी शानदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.