Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Porsche Panamera 2023 : V6 ट्विन-टर्बो इंजिनसह भारतात लॉन्च झाली लक्झरी Porsche Panamera सेडान कार, पहा किंमत

भारतात आणखी एक लक्झरी कार लॉन्च झाली आहे. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. कारचे शक्तिशाली इंजिन कारला अधिक पॉवरफुल बनवते.

0

Porsche Panamera 2023 : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन आलिशान कार सादर केल्या जात आहेत. तसेच ग्राहकांचा देखील या आलिशान कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये Porsche Panamera 2023 सेडान कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये जबरदस्त शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. तुम्हालाही Porsche Panamera 2023 कार खरेदी करायची असेल तर कारचे पुढील आठवड्यापासून बुकिंग सुरु होऊ शकते.

तुमचेही बजेट १ कोटीपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला लक्झरी फीचर्स आलिशान कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात Porsche कार कंपनीकडून त्यांच्या Panamera कारचे नवीन मॉडेल सादर केले आहे.

पोर्श कार उत्पादक कंपनीने त्यांची तिसऱ्या जनरेशनमधील Panamera 2023 कारचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. या कारची भारतीय ऑटो मार्केटमधील किंमत 1.68 कोटी रुपये आहे. या कारमध्ये लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत.

2023 Porsche Panamera किंमत

Porsche कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या आलिशान लक्झरी फीचर्स Panamera 2023 कारची एक्स शोरूम किंमत 1.68 कोटी रुपय ठेवली आहे. 2021 V6 Panamera कारची एक्स शोरूम किंमत 1.57 कोटी रुपये होती.

2023 Porsche Panamera वैशिष्ट्ये

Porsche Panamera 2023 या लक्झरी कारमध्ये अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 8-वे अॅडजस्टेबल इलेक्ट्रिक सीट्स, मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स, 6 एअरबॅग्ज, एक फुल-एचडी 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि नेव्हिगेशनसह पोर्श कम्युनिकेशन मॅनेजमेंट (PCM) अशी मानक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. वायरलेस चार्जिंग, ऑडिओ इंटरफेस आणि साउंड कंट्रोल फीचर्सचा देखील कारमध्ये समावेश आहे.

2023 Porsche Panamera इंजिन

Porsche च्या नवीन Panamera २०२३ कारमध्ये 2.9 लीटर ट्विन-टर्बो V6 इंजिन दिले आहे. हे इंजिन 8-स्पीड पीडीके ऑटो, रीअर-व्हील ड्राइव्ह आणि टू-वे अ‍ॅडॉप्टिव्ह रीअर स्पॉयलरशी जोडण्यात आले आहे. कंपनीकडून या इंजिनच्या पॉवरबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. मात्र कंपनी लवकरच कारच्या इंजिन पॉवरबद्दल माहिती देऊ शकते.