Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Punch EV : टाटा पंच EV लवकरच होणार लॉन्च! सिंगल चार्जमध्ये देणार इतकी मोठी रेंज

टाटा मोटर्सकडून लवकरच त्यांची आणखी एक इलेक्ट्रिक कार पंच एसयूव्ही सादर करणार आहे. कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक आणि प्रीमियम फीचर्स दिले जाणार आहेत.

0

Punch EV : टाटा मोटर्सकडून कमी बजेट ग्राहकांसाठी स्वस्त कार सादर केल्या जात आहेत. टाटाच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्सची पंच एसयूव्ही कार अगदी कमी बजेटमध्ये सादर करण्यात आली आहे.

तसेच टाटा मोटर्सने अलीकडेच पंच एसयूव्ही कार सीएनजी पर्यायासह सादर केली आहे. पंच सीएनजी कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पंच एसयूव्ही कारमध्ये EV पर्याय देखील लवकरच जोडला जाऊ शकतो.

टाटा मोटर्सकडून अलीकडेच त्यांची Nexon EV फेसलिफ्ट कार लाँच केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक देण्यात आला आहे. टाटा मोटर्स पंच एसयूव्ही कारमध्य देखील मजबूत बॅटरी पॅक देऊ शकते. पंच EV कारमध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात येतील.

टाटा पंच EV रेंज आणि बॅटरी पॅक

टाटा पंच एसयूव्ही कारमध्ये पहिला 30kWh बॅटरी पॅक देण्यात येईल. या बॅटरी पॅकवर पंच EV कार 325 किमी रेंज देईल. तसेच कारमध्ये आणखी एक बॅटरी पॅक दिला जाईल. Tiago EV आणि Tigor EV मध्ये वापरण्यात आलेले बॅटरी पॅक कारमध्ये पाहायला मिळू शकतात.

टाटा पंच EV डिझाइन आणि वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून Nexon EV फेसलिफ्ट सारखी काही प्रीमियम वैशिष्ट्ये पंच EV मध्ये दिली जाऊ शकतात. ही कार विशिष्ट ग्रिल तसेच एरो इन्सर्टसह व्हील्स आणि कनेक्ट केलेल्या लाईट बारसह Nexon EV सारखे एलईडी हेडलॅम्प कारमध्ये पाहायला मिळू शकते.

पंच EV कारमध्ये सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान, मोठी टचस्क्रीन, नवीन स्टीयरिंग व्हील आणि समोरील बाजूस चार्जिंग पोर्ट दिले जाईल. तसेच कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल असू शकतो.

पंच EV ची किंमत कमी असू शकते?

टाटा मोटर्स ग्राहकांना अगदी कमी बजेटमध्ये त्यांच्या EV कार उपलब्ध करून देत आहे. २०२४ मध्ये टाटा मोटर्स पंच EV कार सादर करू शकते. त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कारची किंमत २५ लाखांपेक्षा कमी आहे. पकन्ह EV कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11.61 लाख रुपये असू शकते. ही कार Citroen e C3 EV शी स्पर्धा करेल.