Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Punch Facelift SUV : पंच फेसलिफ्टची लॉन्च तारीख आली समोर ! पहा काय होणार बदल…

0

Punch Facelift SUV : टाटा मोटर्सकडून लवकरच त्यांची पंच फेसलिफ्ट एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये अनेक बदल केले जाणार असून अनेक नवीन फीचर्स देखील कारमध्ये जोडले जाणार आहेत.

टाटा मोटर्सकडून त्यांची पंच एसयूव्ही कार जबरदस्त सुरक्षा फीचर्ससह सादर करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा टाटा मोटर्स त्यांची पंच एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे.

अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांच्या मिनी एसयूव्ही पंचचे इलेक्ट्रिक मॉडेल भारतात लॉन्च केले आहे. पंच EV कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक आणि फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र आता पंच फेसलिफ्टच्या लाँच तारीख बाबत महत्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

टाटा मोटर्सकडून पंच फेसलिफ्टच्या लॉन्च तारखेबाबत काही अपडेट्स देण्यात आले आहेत. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन युनिटचे एमडी शैलेश चंद्र यांनी पंच कारच्या लाँच तारखेबाबत माहिती जाहीर करण्यात आली आहे तिला दुजोरा दिला आहे.

पंच फेसलिफ्ट कधी होणार लाँच

एमडी शैलेश चंद्र म्हणाले की, 2025 पर्यंत पंच फेसलिफ्ट एसयूव्ही कार लाँच केली जाईल. पंच कार सर्वात प्रथम ऑक्टोबर 2021 भारतीय ऑटो मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे.

शैलेश चंद्र यांनी सांगितले की, पंच फेसलिफ्टचा कालावधी तीन वर्षांचा आहे म्हणून आम्ही 2025 च्या मध्यात पंच फेसलिफ्ट लाँच केली जाऊ शकते.

पंच फेसलिफ्ट बदलांसह येईल

टाटा मोटर्सकडून त्यांची पंच फेसलिफ्ट एसयूव्ही कार मोठ्या बदलासंह लाँच केली जाईल. पंच फेसलिफ्ट एसयूव्हीच्या फ्रंट बंपर आणि ग्रिलमधील बदलांसोबतच हेडलॅम्प आणि बोनेटमध्ये किरकोळ बदल केली जाण्याची अपेक्षा आहे. तसेच काही अपग्रेड देखील मिळू शकतात.

पंच फेसलिफ्टचे फीचर्स टाटा नेक्सॉन सारखे असतील

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच फेसलिफ्ट कारचे काही फीचर्स नेक्सॉन सारखे असतील असा दावा करण्यात येत आहे. पंच फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये मोठी 12.3-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम असू शकते. मॅन्युअल हँडब्रेकच्या विपरीत, ऑटो-होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह सुसज्ज पंच फेसलिफ्ट सुसज्ज असेल.

टाटा पंचचे सध्याचे मॉडेल

टाटा पंच एसयूव्ही कारमध्ये सध्या 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 86 HP आणि 113 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.

हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. पंच फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये देखील हेच इंजिन दिले जाऊ शकते.