Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Pure EV Scooter Discounts : दिवाळीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीची सुवर्णसंधी! मिळतेय 1 लाख रुपयांची सूट, देते इतकी मोठी रेंज

या दिवाळीमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण इलेक्ट्रिक स्कूटरवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

0

Pure EV Scooter Discounts : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेकजण नवीन बाईक, स्कूटर किंवा कार खरेदी करत असतात. त्यामुळे अनेक ऑटो कंपनीनकडून त्यांच्या वाहनांवर आकर्षक सूट दिल्या जात आहेत. तुम्हीही या दिवाळीत दमदार रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करून लाखो रुपयांची बचत करू शकता.

Pure EV इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांना स्कूटरवर आकर्षक सूट दिली जात आहे. Pure EV स्कूटर खरेदी करून तुम्ही 15,000 ते 20,000 हजार रुपयांची बचत करू शकत.

कंपनीकडून 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान देशभरात वाहन विनिमय शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. कंपनीकडून नवीन ग्राहकांना 40,000 रुपयांची कॅशबॅक रेफरल ऑफरही देण्यात येत आहे.

जर तुम्ही जुनी इलेक्ट्रिक स्कूटर एक्सचेंज केली आणि रेफरल योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरवर 1 लाख रुपयांची सूट दिली जाईल. Pure EV कडून देशातील ऑटो मार्केटमध्ये नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या जात आहेत.

1 लाख स्क्वेअर फूट पेक्षा जास्त मोठे ईव्ही उत्पादन युनिट कंपनीकडून तयार करण्यात आले आहे. कंपनी मुख्यत्वे नेपाळ आणि भूतान सारख्या दक्षिण आशियाई देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते.

Pure EV इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनीकडून नुकतीच ePluto 7G Max इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 201 किमी रेंज देण्यास सक्षम आहे.

ePluto 7G Max इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1,14,999 रुपये आहे. ही स्कूटर भारतात सर्व शहरांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध आहे. या दिवाळीमध्ये तुम्ही देखील ही स्कूटर खरेदी करून पैशांची बचत करू शकता. या स्कूटरची डिलिव्हरी सुरु करण्यात आली आहे.

ePluto 7G Max वैशिष्ट्ये

ePluto 7G Max इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हिल स्टार्ट असिस्ट, डाउनहिल असिस्ट, कोस्टिंग रीजनरेशन, रिव्हर्स मोड आणि स्मार्ट एआय अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. कंपनीकडून ePluto 7G Max या स्कूटरवर 60,000 किलोमीटरची मानक वॉरंटी आणि 70,000 किलोमीटरची विस्तारित वॉरंटी साडेसात येत आहे.

ePluto 7G Max बॅटरी पॅक

ePluto 7G Max इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.5 KWH बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या स्कूटरची बॅटरी AIS-156 प्रमाणित आहे. तसेच स्मार्ट बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. सिंगल चार्जमध्ये २०० किमीपेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम आहे.