Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Bumper Cars Discount : ऑफरचा पाऊस! महिंद्रासह या कार्सवर 2-4 हजार नाही तर मिळतेय 3.5 लाख रुपयांची बंपर सूट

देशातील कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या सर्वच कारवर मोठी ऑफर देण्यात येत आहे. तुम्ही देखील या महिन्यात कार खरेदीवर लाखो रुपयांची बचत करू शकता.

0

Bumper Cars Discount : सणासुदीच्या काळात अनेकजण नवीन कार खरेदी करण्याचे प्लॅन करत असतात. त्यामुळे कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कारवर बंपर ऑफर देण्यात येत आहे. तुम्हीही या दिवाळीमध्ये कार खरेदी करून लाखो रुपयांची बचत करू शकता.

महिंद्रा कार उत्पादक कंपनीसह अनेक कार निर्मात्या कंपन्यांकडून त्यांच्या शानदार कारवर लाखो रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्हीही याचा फायदा घेऊ शकता. या महिन्यापर्यंतच कारवर सूट देण्यात येत आहे.

महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक

महिंद्रा कार उत्पादक कंपनीच्या एकमेव इलेक्ट्रिक एसयूव्ही XUV400 च्या नवीन मॉडेलवर कंपनीकडून ३ लाख तर जुन्या मॉडेल्सवर 3.5 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15.99 लाख रुपये आहे. तसेच कारवर 5 वर्षांसाठी मोफत विमा देखील दिला जात आहे.

Hyundai Kona ऑफर

ह्युंदाई कार कंपनीकडून त्यांच्या Kona इलेक्ट्रिक एसयूव्ही कारवर देखील दिवाळीनिमित्त 2 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे. कंपनीकडून याअगोदर १ लाख रुपयांची सूट दिली जात होती. कारची एक्स शोरूम किंमत 23.84 लाख रुपयांपासून सुरू होते.

Citroen C5 Aircross

Citroen कार उत्पादक कंपनीच्या C5 Aircross एसयूव्ही कारवर देखील दिवाळी ऑफर देण्यात येत आहे. Citroen C5 Aircross वर या महिन्यात 2 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 36.91 लाख रुपये आहे.

Skoda Kushaq

तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल तर तुम्ही या महिन्यात करू शकता. कारण स्कोडा कार कंपनीकडून त्यांच्या Kushaq एसयूव्ही कारवर 1.5 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.89 लाख रुपये आहे.

MG Astor ऑफर

MG कार कंपनीकडून देखील त्यांच्या Astor कारवर मोठी सूट देण्यात येत आहे. कारवर कंपनीकडून 1.75 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.82 लाख रुपये आहे.