Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Renault Cars Offer : 31 डिसेंबरपूर्वी खरेदी करा ही 7-सीटर फॅमिली कार, मिळतेय 50 हजारांची मोठी सूट, असा घ्या लाभ

0

Renault Cars Offer : 2023 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अनके कार उत्पादक कंपन्या त्यांच्या कारवर आकर्षक सूट देत आहेत. तुम्हीही या महिन्यात कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

Renault कार उत्पादक कंपनी त्यांच्या अनेक कारवर मोठी सूट देत आहे. मात्र तुम्हाला या ऑफरचा लाभ घेईचा असेल तर तुम्हाला 31 डिसेंबरपूर्वीच कार खरेदी करावी लागेल. कंपनीकडून कारवर इयर एंड ऑफर देण्यात येत आहे.

Renault Kwid Offer

Renault कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Kwid एसयूव्ही कारवर या महिन्यात 50,000 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. तुम्ही ही नवीन कार खरेदी करून हजारोंची बचत करू शकता. रोख सवलत म्हणून 20 हजार, एक्सचेंज बोनस म्हणून 20 हजार आणि लॉयल्टी बोनस म्हणून 10 हजारांची सूट दिली जात आहे.

Renault Triber

Renault कार उत्पादक कंपनीची Triber 7-सीटर फॅमिली कार अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे. ही कार तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी एक उत्तम पर्याय आहे. Triber 7-सीटर फॅमिली कारवर या महिन्यात 50 हजार रुपयांची आकर्षक सूट दिली जात आहे. रोख सवलत 20 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 20 हजार रुपये आणि लॉयल्टी बोनस 10 हजार रुपये देण्यात येत आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख रुपये आहे.

Renault Kiger

Renault Kiger या शानदार एसयूव्ही कारवर देखील ग्राहकांना या महिन्यात 65 हजार रुपयांची मोठी सूट देण्यात येत आहे. यामध्ये 25 हजार रुपयांची रोख सवलत, एक्सचेंज बोनस म्हणून 20 हजार आणि 20 हजारांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

तुम्हीही या ऑफरचा लाभ घेऊन Renault ची नवीन कार खरेदी करणार असाल तर जवळच्या डिलरशिपमध्ये जाऊन ऑफरबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. ठिकाण आणि व्हेरियंटनुसार ऑफर देखील बदलू शकते.