Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Renault Duster 2024 : शक्तिशाली इंजिन आणि मोठ्या बदलांसह सादर झाली नवीन Duster ! भारतात कधी होणार लॉन्च? जाणून घ्या

रेनॉल्ट कार निर्मात्या कंपनीची नवीन Duster एसयूव्ही कारचे जागतिक बाजारपेठेत अनावरण करण्यात आले आहे. ही कार नवीन इंजिन पर्यायासह भारतात लॉन्च केली जाणार आहे.

0

Renault Duster 2024 : रेनॉल्ट कार उत्पादक कंपनीची आगामी बहुचर्चित नवीन Duster एसयूव्ही कारचे अनावरण करण्यात आले आहे. नवीन Duster एसयूव्ही कारमध्ये मोठे बदल करण्यात आले असून कारला नवीन इंजिन पर्याय देखील देण्यात आला आहे.

रेनॉल्टने जागतिक बाजारपेठेत त्यांची Duster एसयूव्ही कार Dacia नावाने सादर केली आहे. कंपनीने कारची पहिली झलक जगासमोर आणली आहे. ही कार जागतिक बाजारपेठेत Dacia नावानेच विकली जाणार आहे.

सध्या रेनॉल्टने भारतीय ऑटो मार्केटमध्ये Duster एसयूव्ही कारचे उत्पादन बंद केले आहे. मात्र लवकरच नवीन Duster एसयूव्ही कार भारतात लाँच केली जाणार आहे. कारमध्ये ग्राहकांना प्रीमियम फीचर्स देखील मिळतील.

2024 रेनॉल्ट डस्टरचे डिझाइन

जागतिक बाजारात 2024 रेनॉल्ट चे अनावरण करण्यात आले आहे. कारच्या डिझाईनसह फीचर्समध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कारला नवीन इंजिन पर्याय देखील देण्यात आला आहे. नवीन डस्टर एसयूव्ही लवकरच भारतात देखील सादर केली जाईल.

आकर्षक एलईडी हेडलाइट्ससह स्लीक आयताकृती फ्रंट एंड कारमध्ये देण्यात आला आहे. कारला नवीन बंपर देण्यात आला आहे. स्टायलिश राखाडी अॅक्सेंट लोखंडी जाळी देखील कारमध्ये पाहायला मिळत आहे.

तसेच फॉग लाइट्स देखील खालील बाजूस पाहायला मिळत आहेत. कारचा लूक आणखी आकर्षक करण्यासाठी नवीन अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी एका नवीन एसयूव्ही कारचा पर्याय मिळणार आहे.

2024 रेनॉल्ट डस्टर इंजिन

आंतरराष्ट्रीय ऑटो मार्केटमध्ये रेनॉल्ट डस्टर एसयूव्ही कारला तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 120 bhp पॉवर जनरेट करणारे 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.2-लीटर पेट्रोल हायब्रिड इंजिन जे 140 HP ची पॉवर जनरेट करते आणि तिसरे 1.3-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 170 bhp पॉवर जनरेट करते.

भारतात कधी लॉन्च होणार?

नवीन जनरेशन डस्टर एसयूव्ही कार २०२५ मध्ये भारतात लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या ही कार जागतिक बाजारपेठेत सर्वात प्रथम विक्रीसाठी दाखल केली जाणार आहे. नवीन Duster एसयूव्ही कार Creta, Kia Seltos, Honda Elevate आणि Skoda Kushaq सारख्या कारशी स्पर्धा करेल.