Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Renault Duster 2024 : Creta, Seltos, Grand Vitara ला टक्कर देण्यासाठी नवीन Duster सज्ज ! शक्तिशाली इंजिनसह मिळणार ही वैशिष्ट्ये

भारतीय ऑटो मार्केटमध्ये Renault कार उत्पादक कंपनीकडून त्यांची शक्तिशाली नवीन Duster एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. ही कार जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे.

0

Renault Duster 2024 : देशातील एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन एसयूव्हीह कार सादर करत आहेत. आता Renault कार उत्पादक कंपनी देखील त्यांच्या Duster एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल सादर करणार आहे.

Renault कार कंपनीकडून त्यांच्या नवीन Duster एसयूव्ही कारचे जागतिक प्रीमियर नुकताच पोर्तुगालमध्ये पार पडला आहे. पुढील वर्षी ही कार युरोपियन ऑटो मार्केटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही कार जागतिक बाजारपेठेत Dacia नावाने विकली जाऊ शकते. भारतात नवीन Duster कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये नवीन Duster एसयूव्ही लॉन्च झाल्यानंतर Creta, Seltos, Grand Vitara, Hyryder, Elevate, Kushaq आणि Taigun या एसयूव्ही कारशी स्पर्धा करेल. सध्या Duster एसयूव्ही कारचे भारतातील उत्पादन बंद केले आहे.

Duster 2024 डिझाइन आणि वैशिष्ट्ये

नवीन Duster एसयूव्ही कारच्या डिझाईनमध्ये मोठा बदल केला आहे. तसेच कारमध्ये आधुनिक फीचर्स जोडले आहेत. कारच्या इंटेरियरमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

नवीन Duster एसयूव्ही कारमध्ये ड्युअल टोन डॅशबोर्ड लेआउट मिळण्याची शक्यता आहे. ड्रायव्हरच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी 7-इंच डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी 10.1-इंच टचस्क्रीन देखील मिळेल.

आगामी Duster एसयूव्ही कारमध्ये इंटिग्रेटेड कंट्रोल्ससह 3-स्पोक स्टीयरिंग व्हील, 12V पॉवर सॉकेट आणि USB पोर्ट, ADAS अशी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. ADAS मध्ये लेन चेंज अलर्ट, हाय स्पीड अलर्टसह ट्रॅफिक चिन्ह ओळखणे, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, वाहन ओळख, लेन चेंज असिस्ट, रिअर पार्किंग असिस्ट अशा सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश असू शकतो.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये नवीन Duster २०२५ मध्ये सादर केली जाऊ शकते. Duster एसयूव्ही कार CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. कारमध्ये 472 लिटरची मोठी बूट स्पेस दिली जाऊ शकते. या नवीन एसयूव्हीची लांबी 4.34 मित्र असू शकते.

नवीन Duster इंजिन

नवीन Duster एसयूव्ही कारमध्ये तीन इंजिन पर्याय दिले जातील. 1.6L, 4-सिलेंडर पेट्रोल हायब्रिड (ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेटअप) 1.2kWh बॅटरी पॅक आणि 48V सह दिले जाईल, 1.0 लिटर पेट्रोल-एलपीजी इंजिन आणि 1.2L सौम्य हायब्रीड इंजिन 4X2 आणि 4X4 पर्यायासह सादर केले जाईल.