Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Royal Enfield Bullet 350 : अवघ्या 25 हजारांत घरी आणा स्वप्नातील बुलेट 350 बाईक! जाणून घ्या कसे ते

रॉयल एनफिल्ड दुचाकी कंपनीची बुलेट 350 खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत आहेत? तर टेन्शन घेऊ नका. ही बाईक तुम्ही अवघ्या २५ हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता.

0

Royal Enfield Bullet 350 : भारतीय दुचाकी मार्केटमध्ये Royal Enfield च्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. Royal Enfield च्या बुलेट बाईकचे अनेकजण शौकीन आहेत. मात्र बाईकची किंमत जास्त असल्याने अनेकांना ती खरेदी करणे परवडत नाही.

Royal Enfield च्या 350cc ते 650cc पर्यंतच्या शक्तिशाली बाईक्स लॉन्च करण्यास आल्या आहेत. Royal Enfield ने अलीकडेच त्यांची Bullet 350 ही बाईक नवीन व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. तुमचेही बुलेट खरेदी करण्याचे स्वप्न असेल आणि बजेट कमी आहे तर टेन्शन घेऊ नका. कारण तुम्ही अवघ्या २५ हजार रुपयांमध्ये ही बाईक घरी आणू शकता.

Royal Enfield Bullet 350 Black Gold किंमत

या बाईकच्या टॉप मॉडेलमध्ये रॉयल एनफील्ड बुलेट 350 ब्लॅक गोल्ड एडिशन देण्यात आले आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 2,15,801 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ही किंमत रस्त्यावर आल्यानंतर 2,44,680 रुपये इतकी वाढते.

Royal Enfield Bullet 350 Black Gold EMI योजना

तुमचे बाजे कमी असेल तर तुम्ही अवघ्या २५ हजार रुपयांमध्ये Bullet 350 Black बाईक खरेदी करू शकता. २५ हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरून ही शक्तिशाली बाईक EMI वर घरी आणू शकता.

२५ हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला फायनान्स कंपनीकडून २,१९,६८० रुपयांचे कर्ज दिले जाऊ शकते. या कर्जावर तुमच्याकडून वार्षिक ९.७ टक्के व्याज आकारले जाऊ शकते. यानंतर तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 7,058 रुपये मासिक EMI भरावा लागेल.

Royal Enfield Bullet 350 Black Gold इंजिन तपशील आणि मायलेज

Royal Enfield बाईक कंपनीकडून त्यांच्या Bullet 350 Black Gold या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर 349cc 4 स्ट्रोक इंजिन दिले आहे. हे इंजिन एअर-ऑइल कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे.

बाईकचे इंजिन 6100 rpm वर 20.4 PS चा पॉवर आणि 4000 rpm वर 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बाईकचे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही बाईक 40 Kmpl मायलेज देणास सक्षम आहे.