Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Royal Enfield Himalayan 450 : उद्या लॉन्च होणार Himalayan 450 बाईक! पहा पहिल्यापेक्षा किती शक्तिशाली ही बाईक

रॉयल एनफिल्ड उद्या त्यांची Himalayan 450 बाईक लॉन्च करणार आहे. या बाईकमध्ये शक्तिशाली इंजिन बसवण्यात आले असून रायडींग करणाऱ्यांसाठी ही उक उत्तम बाईक आहे.

0

Royal Enfield Himalayan 450 : दुचाकी मार्केटमध्ये रॉयल एनफिल्डकडून त्यांची आणखी एक शक्तिशाली बाईक लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये नवीन बाईक खरेदीदारांना आणखी एका स्टायलिश बाईकचा पर्याय मिळणार आहे.

रॉयल एनफिल्डकडून मिलान या शहरामध्ये 7 नोव्हेंबर म्हणजेच उद्या Himalayan 450 बाईक लॉन्च केली जाणार आहे. ही बाईक पूर्वीपेक्षा वेगळी असणार आहे. तसेच बाईकचे इंजिन देखील अधिक शक्तिशाली असणार आहे.

Himalayan 450 इंजिन

रॉयल एनफिल्डकडून त्यांच्या अनके शक्तिशाली इंजिन बाईक भारतात सादर करण्यात आल्या आहेत. त्यांची बुलेट बाईक सर्वाधिक लोकप्रिय बाईक आहे. आता आगामी Himalayan 450 बाईकमध्ये कंपनीकडून 452cc सिंगल-सिलेंडर DOHC लिक्विड-कूल्ड 4-व्हॉल्व्ह FI इंजिन देण्यात येणार आहे.

बाईकचे हे इंजिन 8,000 rpm वर 40.02 ps पॉवर आणि 5,500 rpm वर 40 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. तसेच हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असेल.

Himalayan 450 बाईकचे वजन

Himalayan 450 बाईकमध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. बाईकमध्ये ड्युअल-पर्पज अॅडव्हेंचर टूरर स्टील, ट्विन-स्पार ट्यूबलर फ्रेमने अंडरपिन केलेले आहे. पूर्वीच्या हिमालयन 411 बाईकपेक्षा Himalayan 450 बाईक ३ किलो वजनानी हलकी असणार आहे.

सस्पेंशनसाठी, 200mm व्हील ट्रॅव्हलसह फ्रंट 43mm अपसाइड-डाउन फॉर्क्स आणि 200mm व्हील ट्रॅव्हलसह लिंक-टाइप मोनोशॉक रिअर सस्पेंशन Himalayan 450 बाईकमध्ये देण्यात आले आहे.

Himalayan 450 वैशिष्ट्ये

Autocar

Himalayan 450 बाईकमध्ये सर्वाधिक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. बाईकमध्ये राईड-बाय-वायर थ्रॉटल, एलईडी हेडलॅम्प, ब्रेक लाइट आणि टर्न इंडिकेटर, गुगल मॅप्स इंटिग्रेशनसह वर्तुळाकार TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, स्प्लिट सीट्स, लगेज रॅक, स्विच करण्यायोग्य मागील ABS अशी वैशिष्ट्ये दिली गेली आहेत.

Himalayan 450 किंमत किती असणार?

Himalayan 450 बाईकच्या कितीबद्दल कंपनीकडून अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र नवीन Himalayan 450 बाईकची अंदाजे एक्स शोरूम किंमत 2.75 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीकडून उद्या या बाईकची किंमत देखील जाहीर केली जाईल.

Himalayan 450 डायमेंशन

Himalayan 450 बाईकची लांबी 2,245 मिमी, रुंदी 852 मिमी आणि उंची 1,316 मिमी देण्यात आली आहे. तसेच बाईकचा ग्राउंड क्लीयरन्स 230 मिमी आणि व्हीलबेस 1,510 मिमी देण्यात आला आहे. तसेच इंधनासाठी बाईकमध्ये 17 लिटरची टाकी देण्यात आली आहे.