Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Royal Enfield Himalayan 452 : शक्तिशाली इंजिन आणि जबरदस्त फीचर्ससह Himalayan 452 ची पहिली झलक उघड! पहा किंमत

नवीन बाईक खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण Royal Enfield ची शक्तिशाली बाईक लवकरच भारतात एन्ट्री करणार आहे. या बाईकमध्ये अनके जबरदस्त फीचर्स पाहायला मिळू शकतात.

0

Royal Enfield Himalayan 452 : भारतीय दुचाकी मार्केटमध्ये रॉयल एनफिल्डच्या अनेक शक्तिशाली बाईक्स उपलब्ध आहेत. या बाईक्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता लवकरच रॉयल एनफिल्डकडून त्यांची Himalayan 452 ही बाईक जबरदस्त फीचर्ससह लॉन्च केली जाणार आहे.

सध्या भारतीय ऑटो बाजारात Himalayan 411 बाईक ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बाईकला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या बाईकचे पुढील Himalayan 452 हे व्हर्जन भारतात लॉन्च केले जाणार आहे. ही बाईक नवीन फीचर्स आणि वैशिष्ट्यांसह भारतात दाखल होणार आहे.

रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 चे डिझाइन

रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 बाईकचे डिझाईन पूर्णपणे वेगळे असणार आहे. एलईडी टर्न इंडिकेटरसह एलईडी हेडलॅम्प, लहान विंडशील्ड, पुन्हा डिझाइन केलेली इंधन टाकी, मोठा इंटरकुलर, नवीन ग्रॅब हँडल्स, नवीन एक्झॉस्ट तसेच नवीन लोखंडी जाळी असे अनेक बदल बाईकमध्ये पाहायला मिळू शकतात.

रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 इंजिन

रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 बाईकमध्ये शक्तिशाली इंजिन दिले जाणार आहे. 452 cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 40 hp पॉवर आणि 45 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल.

Royal Enfield हिमालयन 411 बाईकचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या हिमालयीन बाईक 411 cc इंजिन दिले जात आहे. हे इंजिन 24 hp पॉवर आणि 32 Nm टॉर्क निर्माण करते.

Royal Enfield Himalayan 452 ची अपेक्षित किंमत

नवीन जनरेशन हिमालयन 452 बाईकमध्ये सध्याच्या Royal Enfield Himalayan 411 बाईकपेक्षा अनेक बदल पाहायला मिळू शकतात. नवीन बाईकमध्ये नवीन आणि मोठ्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाऊ शकते.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बाईकची एक्स शोरूम किंमत 2.16 लाख रुपये आहे. नवीन पॉवरट्रेन, प्लॅटफॉर्म, सस्पेंशन सेटअप आणि नवीन तंत्रज्ञानासह सर्व आधुनिक बदल लक्षात घेता नवीन Royal Enfield Himalayan 411 बाईक्सची किंमत यापेक्षा जास्त असू शकते.