Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Royal Enfield Hunter 350 : बजेट कमी आहे? टेन्शन नाही… अवघ्या 21 हजारात घरी आणा रॉयल एनफील्डची शक्तिशाली हंटर 350 बाईक…

नवीन बाईक खरेदी करण्यासाठी बजेट कमी पडतंय? तर टेन्शन घेऊ नका. कारण अगदी 21 हजार रुपयांमध्ये तुम्ही शानदार बाईक घरी आणू शकता.

0

Royal Enfield Hunter 350 : स्वतःची बाईक असण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागानुसार बाईकच्या किमती देखील खूपच वाढली आहेत. त्यामुळे अनेकांना बाईक खरेदी करणे अशक्य झाले आहे. मात्र आता फक्त २१ हजार रुपयांमध्ये रॉयल एनफील्डची शक्तीशाली बाईक घरी आणू शकता.

रॉयल एनफील्डच्या अनेक शक्तिशाली बाईक्स भारतात उपलब्ध आहेत. 350cc ते 650cc पर्यंतच्या इंजिनसह येणाऱ्या रॉयल एनफील्डच्या बाईक भारतात सादर करण्यात आल्या आहेत. रॉयल एनफील्डच्या बाईक्सची तरुणांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

तुमचेही रॉयल एनफील्डची Hunter 350 बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर ते अवघ्या २१ हजार रुपयांमध्ये पूर्ण होईल. त्यासाठी तुम्हाला लाखो रुपयांची गरज नाही. या बाईकवर EMI पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रॉयल एनफील्ड हंटर 350

रॉयल एनफील्ड हंटर 350 या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 1,49,900 रुपये आहे जिची ऑन रोड किंमत 1,73,111 रुपयांपर्यंत जाते. तुमचेही 1,73,111 रुपयांचे बजेट नसेल तर तुम्ही २१ हजार रुपये भरून ही बाईक घरी आणू शकता.

Royal Enfield Hunter 350 Finance Plan

अनेकांचे नवीन बाईक खरेदी करण्या इतके बजेट नसते. मात्र त्यांना बाईक खरेदी करायची असते. Hunter 350 बाईक तुम्ही २१ हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरून घरी आणू शकता. बाकीचे पैसे तुम्हाला फायनान्स कंपनीकडून कर्जाच्या स्वरूपात दिले जातील.

Hunter 350 बाईक खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे कमी कमी २१ हजार रुपये असणे आवश्यक आहे. २१ हजार रुपये डाउनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला 1,52,111 रुपये कर्ज दिले जाईल. या कर्जावर तुमच्याकडून ९.७ टक्के व्याज आकारले जाईल. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 4,887 रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल.

रॉयल एनफील्ड हंटर 350 इंजिन आणि मायलेज

रॉयल एनफील्डकडून त्यांच्या हंटर 350 बाईकमध्ये 249.34cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. बाईकचे इंजिन 20.4 PS ची पॉवर आणि 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही बाईक 36.2 Kmpl मायलेज देते असा दावा करण्यात आला आहे.