Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Safari Facelift : देशातील सर्वात सुरक्षित कार सफारी फेसलिफ्टची डिलिव्हरी सुरु! 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळतात प्रीमियम फीचर्स, किंमत फक्त…

टाटा मोटर्सने त्यांच्या सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कारची डिलिव्हरी सुरु केली आहे. कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

0

Safari Facelift : टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची सफारी आणि हॅरियर फेसलिफ्ट कार लॉन्च केली आहे. या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल कारमध्ये केले आहेत. तसेच कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

टाटा मोटर्सने सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये सर्वाधिक सुरक्षा फिचर दिले आहेत. टाटा मोटर्स नेहमी त्यांच्या कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहे.

टाटा मोटर्स Safari Facelift वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून Safari Facelift कारमध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, टच-आधारित HVAC पॅनेलसह ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, नेव्हिगेशन सपोर्टसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

तसेच सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जर, अॅम्बियंट मूड लाइटिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री सराउंड कॅमेरा, ADAS सूट अशी मानक फीचर्स देखील दिली आहेत.

Safari Facelift इंजिन

सफारी facelift कारमध्ये 2.0-लीटर Kryotec डिझेल इंजिन वापरण्यात आले आहे. सफारीचे इंजिन 168bhp पॉवर आणि 350Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कारचे इंजिन BS6 2.0-नॉर्म्सनुसार अपडेट करण्यात आले आहे.

सफारी फेसलिफ्ट व्हेरियंट

टाटा मोटर्सने त्याची सफारी facelift कार १० व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. स्मार्ट (ओ), प्युअर (ओ), अ‍ॅडव्हेंचर, अ‍ॅडव्हेंचर+, अ‍ॅडव्हेंचर+ डार्क, अ‍ॅकम्प्लिश्ड, अ‍ॅकम्प्लिश्ड डार्क, अ‍ॅकम्प्लिश्ड+ डार्क, अॅडव्हेंचर+ए आणि अॅक्‍प्लिश्ड+ अशी १० व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत.

सफारी फेसलिफ्ट किंमत आणि रंग पर्याय

सफारी facelift कारमध्ये ७ रंग पर्याय देण्यात आले आहेत. कॉस्मिक गोल्ड, गॅलेक्टिक सॅफायर, लुनर स्लेट, ओबेरॉन ब्लॅक, स्टारडस्ट अॅश, स्टेलर फ्रॉस्ट आणि सुपरनोव्हा कॉपर या रंग पर्यायामध्ये सफारी कार उपलब्ध आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16.19 लाख रुपये आहे. या कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.