Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

7 लाख रुपयांत लोखंडासारखी मजबूत कार! अपघात झाला तरी जाणार नाही जीव, आहेत बेस व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग ! Safe Car In India

कंपनीने Hyundai Exter मध्ये एकापेक्षा एक मस्त मस्त फीचर्स तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त सेफ्टी फीचर्स देखील दिले आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो कि भारतीय ऑटो बाजारात ही मस्त एसयूव्ही  5.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह लाँच झाली आहे.

0

Safe Car In India : भारतीय बाजारात ऑटो कंपनी Hyundai ने मोठा धमाका करत आपली नवीन मायक्रो SUV Hyundai Exter अगदी कमी किमतीमध्ये लाँच केली आहे. यामुळे जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन एसयूव्ही कार खरेदीचा विचार करत असाल तर Hyundai Exter तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते.

हे जाणून घ्या कि कंपनीने Hyundai Exter मध्ये एकापेक्षा एक मस्त मस्त फीचर्स तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त सेफ्टी फीचर्स देखील दिले आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो कि भारतीय ऑटो बाजारात ही मस्त एसयूव्ही  5.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह लाँच झाली आहे.

इतक्या स्वस्तात मिळत असणाऱ्या या मायक्रो एसयूव्हीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यातच आता मिळालेल्या माहितीनुसार  Hyundai Exter कंपनीची 5 स्टार NCAP रेटिंग कार बनू शकते.

एक्स्टरच्या सुरक्षेबाबत कंपनीचे सीईओ तरुण गर्ग म्हणाले की, एक्स्टरच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेवर आमचे मुख्य लक्ष आहे. त्याच्या स्टॅन्डर व्हेरियंट 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ऑल सीटसाठी 3 पॉइंट सीट बेल्ट सारखी सुरक्षा फीचर्स आहेत. अशा परिस्थितीत या कारला एनसीएपीकडून चांगले सुरक्षा रेटिंग मिळण्याची अपेक्षा आहे. 1 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार्‍या भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अंतर्गत एक्सेटर क्रॅश टेस्टिंग घेण्याची कंपनीची योजना आहे.

Hyundai Exter सेफ्टी फीचर्स

सुरक्षिततेच्या फीचर्सच्या बाबतीत बेस EX Exter व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग, EBD सह ABS, सेंट्रल लॉकिंग, सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, मागील पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (EX (O) फक्त), हिल स्टार्ट असिस्ट (केवळ EX (O)), व्हीकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट (EX (O) फक्त).

या व्यतिरिक्त, या व्हेरियंटमध्ये कीलेस एंट्री, एलईडी टेल लॅम्प, बॉडी-रंगीत बंपर, 4.2-इंच MID सह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टीपल रीजनल UI लेंग्वेज, फ्रंट पॉवर विंडो,  एडजेस्टेबल रियर हेडरेस्ट, मॅन्युअल एसी आणि ड्रायव्हर सीट  हाइट एडजेस्टमेंट मिळते. हे मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.2 पेट्रोल इंजिनसह येते.

Hyundai Exter डिझाइन

नवीन Exter  चे डिझाईन स्पोर्टी आणि बोल्ड आहे आणि त्यात तरुणांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. त्याचा ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे आणि त्याला 319 लीटर बूट स्पेस देखील मिळते. कंपनीने याला 6 मोनोटोन आणि 3 ड्युअल टोन कलर पर्यायांमध्ये सादर केले आहे.नवीन एक्सटरची एक्स-शोरूम किंमत 5,99,900 ते 9,99,990 रुपये आहे.