Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Sedans Cars In India : भारतीयांना सेडान कारची भुरळ! जून 2023 मध्ये या 5 गाड्यांची सर्वाधिक विक्री

भारतातील सेडान कारमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. एसयूव्ही कारच्या एंट्रीनंतर सेडान कारच्या विक्रीमध्ये घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्या कारच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.

0

Sedans Cars In India : भारतात दिवसेंदिवस एसयूव्ही कारची विक्री वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सेडान कारच्या विक्रीमध्ये झपाट्याने घट होत असल्याचे काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून एसयूव्ही कारच्या निर्मितीकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे दिसत आहे.

मात्र Hyundai कंपनीची Verna ही सेडान कार लॉन्च झाल्यानंतर पुन्हा लोकांच्या नजरा सेडान कारकडे वळल्या आहेत. सेडान कारचा लूक, त्यांची उंची आणि कमी ग्राउंड क्लीयरन्समुळे त्या लक्झरी कार दिसतात.

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील ५ सेडान कार सर्वोत्तम ठरू शकतात. कारण भारतात २०२३ मध्ये ५ सेडान कारचा सर्वाधिक खप झाला आहे.

सेडान कार विक्री अहवाल जून 2023

गेल्या महिन्यात, सेडानची विक्री जून 2023 मध्ये 11.50 टक्क्यांनी घसरून 32,024 युनिट्सवर आली. हे जून 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 36,186 युनिट्सपेक्षा कमी होते. मे 2023 मध्ये सादर केलेल्या 31,530 युनिटच्या तुलनेत MoM विक्री 1.57 टक्क्यांनी सुधारली आहे.

मारुती डिझायर

मारुती सुझुकी कंपनीच्या कार भारतामध्ये सर्वाधिक विकल्या जातात. मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर ही सेडान कारला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जून 2023 मध्ये मारुती डिझायर या सेडान कारची एकूण 9,322 वाहनांची विक्री झाली आहे.

ह्युंदाई ऑरा

ह्युंदाई कंपनीच्या कारला देखील भारतामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात सर्वाधिक कार विक्रीच्या बाबतीत ह्युंदाई दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यामध्ये ह्युंदाई कंपनीने त्यांच्या ऑरा या सेडान कारची एकूण 4,907 युनिट्स विकली आहेत. तसेच गेल्या वर्षी २०२२ जूनमध्ये याच कारची 4,102 युनिट्स विकली गेली होती.

ह्युंदाई Verna

ह्युंदाई कंपनीची Verna ही सेडान कार सर्वाधिक विकली तसेच कंपनीकडून गेल्या काही महिन्यांमध्ये या कारचे नवीन मॉडेल सादर करण्यात आले आहे. जून 2022 मध्ये या कारचे एकूण 4,001 वाहने विकली गेली आहेत. तसेच या वर्षी या कारच्या विक्री मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वार्षिक 134.94 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे.

होंडा Amaze

होंडा Amaze या सेडान कारच्या विक्रीमध्ये देखील वाढ झाली आहे. या कारला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2023 मध्ये या कारची एकूण 3,602 युनिट्स विक्री झाली आहेत.

टाटा टिगोर

टाटा मोटर्सच्या कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीच्या कारमध्ये ग्राहकांना कमी किमतीत अधिक फीचर्स दिले जात आहेत. तसेच या कंपनीची टिगोर ही सेडान कार देखील चांगलीच लोकप्रिय झाली आहे.