Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Skoda Kushaq SUV : Creta, Nexon पेक्षा जास्त सुरक्षित आहे ही डॅशिंग कार! 6 एअरबॅग्ससह मिळतात उत्कृष्ट फीचर्स

तुम्हीही सर्वात सुरक्षित कार म्हणून Creta किंवा Nexon एसयूव्ही कारचा पर्याय निवडला असेल तर जरा थांबा. कारण बाजारात Creta, Nexon पेक्षा देखील सर्वात सुरक्षित कार उपलब्ध आहे.

0

Skoda Kushaq SUV : नवीन कार खरेदी करत असताना अनेक ग्राहक सुरक्षित कारचा पर्याय निवडत आहेत. देशातील ऑटो मार्केटमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंगसह येणाऱ्या अनेक एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तुम्ही Nexon किंवा Creta एसयूव्ही खरेदीचा विचार केला असेल तर जरा थांबा.

सध्या ऑटो बाजारात टाटा मोटर्सची Nexon एसयूव्ही कार सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ग्राहकांमध्ये प्रचलित आहे. मात्र या कारपेक्षा देखील आणखी सुरक्षित काही एसयूव्ही कार बाजारात उपलब्ध आहेत. आजकाल अनेक ग्राहक ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही कारला सर्वाधिक पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

क्रेटा एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते. दार महिन्याला या कारचे एकूण 12-13 हजार युनिट्सची विक्री होत आहे. क्रेटा कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने टाटा Nexon ची क्रेझ कमी झाली आहे.

सध्या ऑटो बाजारात अशी एक एसयूव्ही कार उपलब्ध आहे जिला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. या कारची किंमत देखील ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही कार इतकीच आहे. भासला तर जाणून घेऊया कोणती आहे ही कार?

सुरक्षिततेत क्रेटाला बीट करते

Skoda Kushaq एसयूव्ही कार तुमच्यासाठी सर्वाधिक सुरक्षित कार आहे. ही कार ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही कारपेक्षा अधिक सुरक्षित आहे. Skoda Kushaq एसयूव्ही कारमध्ये मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Skoda Kushaq एसयूव्ही कारमध्ये प्रौढ प्रवाशांसाठी 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले नाही तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी या कारने 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले आहे. ह्युंदाई क्रेटा कारने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये प्रौढ आणि बाल प्रवाशांसाठी फक्त 3-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले आहे.

वैशिष्ट्ये आणि तपशील

Skoda Kushaq एसयूव्ही कारमध्ये 1.0-लिटर 3 सिलेंडर आणि 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि 7-स्पीड DCT (ड्युअल-क्लच ट्रान्समिशन) चा पर्याय देखील देण्यात आला आहे.

कारचे 1.0-लिटर 3 सिलेंडर इंजिन 115 bhp पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे तर 1.5-लिटर टर्बो इंजिन 150 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार 19 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Skoda Kushaq एसयूव्ही कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ESC, ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, रोलओव्हर संरक्षण, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, पाचही सीटसाठी थ्री-पॉइंट सीटबेल्ट, मागील सीटसाठी ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम अशी मानक वैशिष्ट्ये दिली आहेत. कारच्या टॉप मॉडेलमध्ये सहा एअरबॅग्ज उपलब्ध आहेत.