Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Sonet Facelift SUV : Nexon, XUV300 आणि Brezza च्या अडचणीत होणार वाढ! किआ लॉन्च करणार ही जबदस्त SUV

देशातील ऑटो बाजारात किआ कार कंपनी त्यांची नवीन जबरदस्त एसयूव्ही कार लॉन्च करण्याची शक्यता आहे. कारच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये मोठे बदल पाहायला मिळतील.

0

Sonet Facelift SUV : किआ कार उत्पादक कंपनीकडून २०२४ मध्ये आणखी नवीन एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. किआ त्यांची स्टायलिश एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च करणार आहे.

किआ त्यांच्या Sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच लॉन्च करणार असून या कारमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. किआने त्यांची Sonet एसयूव्ही कार २०२० मध्ये भारतात लॉन्च केली होती.

आता कंपनीकडून डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या Sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. या कारला नवीन डिझाईनसह नवीन फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे.

बाहेरील डिझाईनमध्ये होणार मोठे बदल

किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्याबाहेरील डिझाईनमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. फ्रंट, बॅक आणि साइड प्रोफाईलला स्टायलिश लूक देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ही कार मिनी Seltos सारखी दिसेल असा दावा करण्यात येत आहे. कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स दिल्या जातील.

Sonet फेसलिफ्टला नवीन DRL मिळतील

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारला नवीन DRL आणि मुख्य हेडलॅम्पचे डिझाईन देखील नवीन मिळण्याची शक्यता आहे. ही कार चाचणी दरम्यान स्पॉट झाली असून कारचे काही फीचर्स लीक झाले आहेत.

कारचा लूक आकर्षक बनवण्यासाठी नवीन अलॉय व्हील्स दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच बंपरमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. कारमध्ये ड्युअल टोन रंग पर्याय दिला जाऊ शकतो.

किआ सोनेट फेसलिफ्ट इंजिन

किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.2-लीटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. ही कार बाजारात सादर होताच Tata Nexon, Mahindra XUV300, Maruti Brezza, Maruti Front, Nissan Magnite आणि Renault Kiger शी स्पर्धा करेल.

किआ सोनेट फेसलिफ्ट

किआ कार उत्पादक कंपनी त्यांच्या सोनेट फेसलिफ्ट एसयूव्ही कारला नवीन फीचर्स आणि लूक देण्याची शक्यता आहे. Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार पॉवरफुल इंजिनसह सादर केली जाईल. कारमध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सेंटर कन्सोल पाहायला मिळेल.