Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Sunroof CNG Cars : सनरूफसह येतात या 4 CNG कार ! दमदार मायलेज आणि किंमतही खूपच कमी

0

Sunroof CNG Cars : नवीन कार खरेदी करताना अनेकजण सनरूफसह येणाऱ्या कारचा पर्याय निवडत असतात. मात्र सनरूफसह येणाऱ्या कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागतात. तसेच कारचे मायलेज देखील कमी असल्याने अनेकांना त्या कार खरेदी करणे परवडत नाही.

तुम्हीही भारतीय ऑटो मार्केटमध्ये सनरूफसह येणारी CNG कार शोधात असाल तर टाटा ते मारुतीपर्यंच्या कार बाजारात उपलब्ध आहेत. या कार दमदार मायलेज देण्यास सक्षम असून त्यांची किंमत देखील कमी आहे.

Tata Altroz ​​CNG

टाटा मोटर्सकडून त्यांच्या स्वस्त CNG कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. टाटाकडून त्यांच्या या स्वस्त CNG कारमध्ये सनरूफ सारखे शानदार फीचर्स देखील दिले जात आहे. Tata Altroz CNG कार सनरूफसह बाजारात उपलब्ध आहे.

Altroz CNG कारमध्ये सिंगल-पेन सनरूफ देण्यात येत आहे. कारची एक्स शोरूम किंमत 8.85 लाख रुपये आहे. Altroz CNG हॅचबॅक कार 26.2 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

कारमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर आणि ऑटोमॅटिक एसी असे फीचर्स देण्यात आले आहेत.

टाटा पंच सीएनजी

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच CNG कारमध्ये देखील सनरूफ फीचर्स दिले आहे. Accomplished Dazzle S व्हेरियंटमध्ये CNG सह सनरूफ उपलब्ध आहे. कारची एक्स शोरूम किंमत 9.68 लाख रुपये आहे. पंच CNG कार 27 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Hyundai Exter CNG

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Exter CNG कारच्या SX CNG व्हेरियंटमध्ये सिंगल-पेन सनरूफ देण्यात येत आहे. Exter CNG कार 27.10 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

कारची एक्स शोरूम किंमत 9.06 लाख रुपये आहे. कारमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि ऑटोमॅटिक एसी असे फीचर्स दिले जात आहेत.

Maruti Brezza CNG

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या ब्रेझा CNG कारमध्ये देखील सिंगल-पेन सनरूफ देण्यात येत आहे. कारची एक्स शोरूम किंमत 12 लाख रुपये आहे.

ब्रेझा एसयूव्ही कारचे CNG मॉडेल 25.51 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. ब्रेझा एसयूव्हीच्या ZXi CNG व्हेरियंटमध्ये सनरूफ पर्याय देण्यात येत आहे.