Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Punch : शानदार एसयूव्ही ! 32Kmpl चे मायलेज, सेफ्टीबाबत 5 स्टार रेटिंग..किंमत फक्त ६ लाख

0

सध्या देशातील ऑटोमोबाईल मार्केट प्रचंड तेजीत आले आहे. मागील काही महिन्याची आकडेवारी पाहिली तर मागील वर्षीच्या तुलनेत प्रचंड कार विक्री झाली आहे. सध्या लोकांची कारबाबत टेंडन्सी बदलत चालली आहे.

Tata Punch
Tata Punch

शहरी लोकांना मायक्रो एसयूव्हीबाबत क्रेझ निर्माण झाली आहे. लोक हॅचबॅक किंवा बजेट कारपेक्षा एसयूव्ही सेगमेंटला अधिक पसंती देत आहेत. खासकरून मायक्रो एसयूव्हीला लोकांची जास्त पसंती दिसून येत आहे.

याच मायक्रो सेगमेंटमध्ये येते Tata Punch. ही कार शहरी भागात राहणाऱ्या छोट्या कुटुंबांची पहिली पसंती ठरत आहे. यातील फीचर्स देखील जबरदस्त आहेत. छोटी असूनही ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत एक नम्बर असून तिला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारचा लूक लोकांना प्रेमात पाडत आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Tata Punch
Tata Punch

टाटा पंच मध्ये हरमन कंपनीची 7-इंच स्क्रीन असणारी इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. तसेच यात जर पाहिले तर डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदर रॅप्ड फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, क्लायमेट कंट्रोल, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, सिटी आणि इको ड्राइव्ह मोड, आदी फीचर्सची रेलचेल पाहायला मिळते. सेफ्टी फीचर्सजर म्हटलं तर यात सेफ्टीसाठी 2 एअरबॅग, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, चाइल्ड लॉक, ABS, EBD, रिअर पार्किंग सेन्सर आदी भन्नाट फिचर्स आहेत. म्हणजेच सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली गेली आहे.

इतर काही स्पेसिफिकेशन जर पाहिले तर यात 1.2 लीटर नॅच्युरल एस्पिरेटेड 3 सिलेंडर रेव्हट्रॉन इंजिन देते. हे इंजिन 84 बीएचपी पॉवर जनरेट करत असल्याने एकदम पॉवरफुल ऊर्जा त्याठिकाणी मिळते. कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल व ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन ऑप्शन दिले आहेत. विशेष म्हणजे ही कार सीएनजी ऑप्शनमध्येही उपलब्ध असून 32 किमी प्रति किलोपर्यंत मायलेज देते.

किंमत

Tata Punch
Tata Punch

 

टाटाच्या या कारची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. पंचची प्रारंभिक किंमत 6 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारचे टॉप व्हेरियंट 9.52 लाख रुपयांपर्यत जाते.