Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Suzuki Swift : 40kmpl मायलेज आणि शक्तिशाली इंजिन! ‘या’ दिवशी बाजारात लाँच होणार मारुतीची शानदार कार

बाजारात आता लवकरच तुम्हाला मारुतीची नवीन कार धुमाकूळ घालताना दिसणार आहे. यात 40kmpl मायलेज मिळेल.

0

Suzuki Swift : भारतीय बाजारात मारुतीच्या कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या प्रत्येक नवीन कारमध्ये काही ना काही नवीन फीचर ग्राहकांना पाहायला मिळते. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे.

अशातच आता कंपनी आपली नवीन कार भारतीय बाजारात लाँच करणार आहेत. यात ग्राहकांना 40kmpl मायलेज मिळेल. इतकेच नाही तर कंपनीची नवीन स्विफ्ट मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनने सुसज्ज असून शक्तिशाली इंजिन पाहायला मिळेल. जाणून घ्या फीचर्स.

ड्राइव्ह अँड फील

कंपनीने ‘ड्राइव्ह अँड फील’ ही संकल्पना लक्षात घेऊन नवीन संकल्पना मॉडेल तयार केले जाईल असे म्हटले आहे. एकंदरीतच आगामी कारची स्टाइलिंग सध्याच्या पिढीच्या स्विफ्ट हॅचबॅक प्रमाणेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिझाइनमध्ये काही बदल केले जातील. ग्रिलवर थोडासा बदल तुम्हाला पाहायला मिळेल.

हे लक्षात घ्या की नवीन पिढी 2024 सुझुकी स्विफ्टमध्ये क्लॅमशेल बोनेट असेल. जे SUV मध्ये खूप सामान्य असून या हॅचबॅकमध्ये नवीन शैलीचे एलईडी हेडलॅम्प आणि नवीन फॉग लॅम्प हाउसिंग असणार आहेत. कंपनीची आगामी कार जुन्या मॉडेलपेक्षा अधिक शक्तिशाली आणि वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे.

नवीन स्विफ्टच्या आतील भाग मोठ्या प्रमाणात नवीन बॅलेनो हॅचबॅकपासून प्रेरित असण्याची शक्यता आहे. ते ड्युअल-टोन ब्लॅक आणि ग्रे शेडसह असेल. यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह नवीन 9-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, मल्टी-फंक्शनल स्टिअरिंग व्हील, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल तसेच क्लायमेट कंट्रोल, हेड्स-अप डिस्प्ले इ. पाहायला मिळेल.

भारतीय बाजारात होणार लाँच

हे लक्षात घ्या की मारुती सुझुकी 2024 च्या पहिल्या सहामाहीत नवीन जनरेशन स्विफ्ट हॅचबॅक सादर करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, कंपनीची नवीन स्विफ्ट मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनने सुसज्ज असणार आहे. यात मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनसह नवीन 1.2-लीटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. आगामी हॅचबॅक कारमध्ये कंपनी 40kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.