Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Taigun Trail Edition vs Creta Adventure Edition कोणती आहे बेस्ट SUVs? जाणून घ्या किंमत फीचर्स आणि व्हेरियंट

तुम्हालाही नवीन एसयूव्ही खरेदी करण्यासाठी बेस्ट कारचा पर्याय निवडायचा असेल तर तुमच्यासाठी अनेक कंपन्यांच्या उत्तम फीचर्स कार उपलब्ध आहेत. यामधील एसयूव्ही कारचा पर्याय तुम्ही निवडू शकता.

0

Taigun Trail Edition vs Creta Adventure Edition : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार लॉन्च केल्या जात आहेत.

अलीकडेच भारतामध्ये फोक्सवॅगनने त्यांच्या Taigun एसयूव्ही कारचे ट्रेल एडिशन लॉन्च केले आहे. ही कार थेट ह्युंदाई क्रेटा अॅडव्हेंचर एडिशनशी स्पर्धा करेल. तुम्हालाही या दोन्ही एसयूव्हीबद्दल माहिती नसेल तर आज जाणून घ्या.

व्हेरियंट आणि किंमत

Volkswagen कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या नवीन Taigun एसयूव्ही कारचे फक्त एक GT Edge Trail Edition लॉन्च केले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 16.29 लाख रुपये आहे.

तर ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या Creta Adventure Edition चे SX MT आणि SX (O) CVT अशी दोन व्हेरियंट लॉन्च केली आहेत. या कारच्या SX MT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 15.2 लाख रुपये आहे तर SX (O) CVT या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 17.9 लाख रुपये आहे.

डिझाईन

फोक्सवॅगन Taigun ट्रेल एडिशनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. रीस्टाइल केलेले मागील फेंडर्स, दरवाजे आणि सी-पिलर, ‘ट्रेल’ बॅजिंग, फंक्शनल रूफ रेल, ब्लॅक-आउट 17-इंच अलॉय व्हील, रेड फ्रंट ब्रेक कॅलिपर, ब्लॅक-आउट रूफ कारमध्ये देण्यात आले आहे.

Creta Adventure एसयूव्ही कारमध्ये ब्लॅक-आउट ग्रिल आणि ब्लॅक स्किड प्लेट्स देण्यात आले आहेत. बाजूने डोर क्लेडिंग, फ्रंट फेंडरवर अॅडव्हेंचर लोगो आणि बॉडी-रंगीत डोअर हँडल्स मिळतात. 17-इंच अलॉय व्हील्स कारमध्ये देण्यात आले आहेत.

इंटेरियर

फोक्सवॅगन Taigun ट्रेल एडिशनच्या केबिनमध्ये लक्झरी फीचर्स दिले गेले आहेत. 10-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, वायरलेस फोन कनेक्टिव्हिटी आणि चार्जिंग, ऑटोमॅटिक हेडलँप, रिअर कॅमेरा, TPMS आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशी वैशिष्ट्ये दिलेली आहेत.

तसेच Creta Adventure एसयूव्ही कारच्या केबिनमध्ये देखील उत्तम फीचर्स दिले आहेत. कारमध्ये ऑल-ब्लॅक इंटीरियर थीम देण्यात आली आहे. सेज ग्रीन इन्सर्टसह ब्लॅक थीममधील अपहोल्स्ट्री आणि अॅडव्हेंचर एडिशनला खास फ्लोअर मॅट्स आणि मेटल पेडल्स दिले आहेत.

इंजिन

Creta Adventure एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर NA पेट्रोल इंजिन ऑफर करण्यात आले आहे. हे इंजिन 115 hp आणि 144 Nm पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. कारच्या SX व्हेरियंटमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

तसेच कारच्या SX(O) व्हेरियंटमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. Taigun कारच्या नवीन एडिशन कारमध्ये Taigun Taigun 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 148 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच हे इंजिन फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.