Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Altroz CNG : मस्तच! अवघ्या 99 हजारांत घरी आणि Altroz ​​CNG कार, देते 26 Kmpl मायलेज…

तुम्हीही कमी बजेटमध्ये सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टाटा अल्ट्रोझ सीएनजी कार सर्वोत्तम पर्याय आहे. ही कार तुम्ही फक्त ९९ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

0

Tata Altroz CNG : भारतामध्ये पेट्रोल आणि सीएनजीच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन कार खरेदीदार सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. दिवसेंदिवस सीएनजी कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होत चालली आहे.

सीएनजी कारच्या मागणीतील वाढ पाहता अनेक कंपन्यांकडून सीएनजी वाहन निर्मितीवर अधिक भर दिला जात आहे. या कार कमी खर्चात सर्वाधिक मायलेज देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अशा कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक कार सीएनजी व्हर्जनमध्ये सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला टाटाची Altroz ​​CNG कार खरेदी करायची असेल तर तुम्ही अवघ्या ९९ हजार रुपयांमध्ये ही कार घरी घेऊन जाऊ शकता.

Tata Altroz ​​CNG किंमत

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सीएनजी कारच्या किमती देखील खूपच आहेत. त्यामुळे अनेकांना त्या खरेदी करणे शक्य होत नाही. टाटा Altroz ​​CNG बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7,55,400 रुपये आहे तर या कारची ऑन रोड किंमत 8,51,740 रुपये आहे.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी फायनान्स योजना

तुमच्याकडेही ही कार खरेदी करण्यासाठी 8.5 लाख रुपयांचे बजेट नसेल तर तुम्ही फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊ शकता. हे कर्ज घेतल्यानंतर तुम्ही अवघ्या ९९ हजार रुपयांमध्ये ही कार घरी आणू शकता.

जर तुम्ही टाटा Altroz ​​CNG कार 99 हजार रुपयांमध्ये खरेदी केली तर तुम्हाला या कारवर 7,52,740 रुपये कर्ज घ्यावे लागेल. या कर्जावर तुमच्याकडून 9.8 वार्षिक व्याज आकारले जाईल. ५ वर्षासाठी तुम्हाला हे कर्ज दिले जाईल. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुमच्याकडून 15,920 रुपये मासिक हफ्ता भरावा लागेल.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी इंजिन आणि मायलेज

टाटा अल्ट्रोझ सीएनजी कारमध्ये कंपनीकडून 1199 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6000 rpm वर 72.41 bhp पॉवर आणि 3300 rpm वर 103 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे. ही कार २६.२ Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.