Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Altroz Discount Offer : 5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि 26 Kmpl मायलेज! खरेदी करा टाटाची ही स्टायलिश कार, मिळतेय बंपर ऑफर

टाटा मोटर्सकडून त्यांच्या शानदार हॅचबॅक कारवर या महिन्यात आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. 5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि 26 Kmpl मायलेज देणारी कार खरेदी करून तुम्ही हजारोंची बचत करू शकता.

0

Tata Altroz Discount Offer : टाटा मोटर्स देशातील ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक नवनवीन कार सादर करत आहे. तसेच त्यांच्या सर्वच कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यावर टाटा मोटर्स अधिक भर देत आहे. तुम्हालाही कमी बजेटमध्ये टाटाची जबरदस्त हॅचबॅक कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

टाटा मोटर्सकडून नोव्हेंबर २०२३ या महिन्यात त्यांच्या अनेक कारवर आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. टाटा मोटर्सकडून त्यांच्या Altroz हॅचबॅक कारवर 35 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही देखील हजारो रुपयांची बचत करू शकता.

टाटा अल्ट्रोझ डिस्काउंट ऑफर

टाटा अल्ट्रोझ कारवर या महिन्यात डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. 35 हजार रुपयांच्या ऑफरमध्ये 20 हजार रुपयांपर्यंत रोख सूट आणि 10 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. तसेच 5 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देखील देण्यात येत आहे. ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ही ऑफर देण्यात येत आहे. ही कार Baleno आणि Glanza शी स्पर्धा करते.

टाटा अल्ट्रोझ सेफ्टी फीचर्स

टाटा मोटर्स नेहमीच त्यांच्या सर्व कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देत असते. Altroz कारमध्ये कंपनीकडून मागील पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल, ब्रेक स्वे कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. गोलबल NCAP चाचणीमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

टाटा अल्ट्रोझ इंजिन

टाटा मोटर्सकडून अल्ट्रोझ तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल, 1.2 लीटर पेट्रोल-CNG आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहेत. 6-स्पीड DCA ट्रान्समिशन केवळ 1.2 लिटर NA पेट्रोलपर्यंत मर्यादित आहे.

टाटा अल्ट्रोझ किंमत

टाटा मोटर्सकडून त्यांची अल्ट्रोझ कार अगदी कमी बजेटमध्ये सादर केली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.60 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.74 लाख रुपये आहे. Altroz कारचे पेट्रोल व्हेरियंट 18.5 Kmpl मायलेज देते तर सीएनजी मॉडेल 26 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.