Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Altroz Discount : त्वरा करा ! टाटा मोटर्स Altroz कार खरेदीवर देतेय 45,000 बंपर सूट, असा घ्या लाभ

0

Tata Altroz Discount : टाटा मोटर्सकडून त्यांच्या Altroz हॅचबॅक कारवर डिसेंबर 2023 या महिन्यात मोठी ऑफर देण्यात येत आहे. तुम्हीही ही कार कार 31 डिसेंबर 2023 पर्यंत खरेदी करून 45,000 मोठी बचत करू शकता.

देशातील अनेक कार उत्पादक कंपनयनांकडून त्यांच्या दमदार कारवर इयर एंड ऑफर देण्यात येत आहे. तुम्हीही टाटा मोटर्सची Altroz हॅचबॅक कार खरेदी करून हजारो रुपयांची मोठी बचत करू शकता.

टाटा मोटर्सकडून Altroz कारवर या महिन्यात ऑफर देण्यात येत असली Altroz कारच्या काही व्हेरियंटची किंमत वाढवण्यात आली आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या Altroz हॅचबॅक कारच्या काही व्हेरियंटची 10,000 ते 15,000 रुपयांनी वाढवली आहे. तसेच टाटा मोटर्स त्यांच्या काही कारच्या किमती नवीन वर्षात वाढवणार आहे.

टाटा Altroz कारला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे. ही कार थेट मारुती सुझुकी बलेनो, Hyundai i20 आणि Toyota Glanza हॅचबॅक कारशी स्पर्धा करते. टाटाची Altroz कार तुमच्या छोट्या फॅमिलीसाठी उत्तम 5 सीटर कारचा पर्याय आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.

Altroz कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दोन एअरबॅग्ज, चाइल्ड लॉक, चाइल्ड सीटसाठी अँकर पॉइंट, ओव्हरस्पीड वॉर्निंग, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, अँटी थेफ्ट इंजिन इमोबिलायझर, सेंट्रल लॉकिंग असे मानक फीचर्स देण्यात आले आहेत.

टाटा Altroz इंजिन

टाटा Altroz हॅचबॅक कारमध्ये 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर डिझेल असे तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.

कारची तीनही इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहेत. Altroz कारचे पेट्रोल व्हेरियंट 19.33 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी इंजिन 26.2 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Tata Altroz किंमत

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Altroz हॅचबॅक कारची किंमत अगदी कमी ठेवण्यात आली आहे. कमी बजेट ग्राहक देखील ही सुरक्षित कार खरेदी करू शकतात. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.60 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.74 लाख रुपयांपर्यंत जाते.

Altroz कारच्या CNG व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.55 लाख रुपये आहे. तुम्हालाही Altroz कार खरेदीवर 45,000 हजार रुपयांची बचत करायची असेल तर आजच जवळच्या टाटा डिलरशिपला भेट देऊन कार बुक करा.