Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Altroz : 210 लीटरची मोठी बूट स्पेस आणि 26 Kmpl मायलेज! टाटाच्या या CNG कारमध्ये मिळतात लक्झरी, किंमत फक्त 6 लाख

टाटा मोटर्सकडून ऑटो बाजारात अनेक सीएनजी कार सादर केल्या आहेत. या सीएनजी कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हालाही टाटाची सीएनजी कार खरेदी करायची असेल तर ६ लाखांच्या बजेटमध्ये एक शानदार कार उपलब्ध आहे.

0

Tata Altroz : टाटा मोटर्सकडून सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी पाहता अनेक कार ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्स आणखी नवीन सीएनजी कार देखील सादर करणार आहे.

देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे अनेक नवीन कार खरेदीदार सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. टाटा मोटर्सकडून अगदी ६ लाख रुपयांच्या बजेटमध्ये शानदार फीचर्स सीएनजी कार सादर केली आहे. या सीएनजी कारमध्ये एक नाही तर दोन सीएनजी छोटे सिलिंडर देण्यात येत आहेत.

कारमध्ये 210 लीटरची मोठी बूट स्पेस

टाटा Altroz CNG कार तुम्च्य्साठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. Altroz CNG कारमध्ये 210 लीटरची मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. Tata Altroz ​​CNG कारमध्ये 30-30 लिटरचे दोन सिलिंडर देखील दिले आहेत.

सहा महिने प्रतीक्षा

तुम्हालाही टाटा मोटर्सची अल्ट्रोझ सीएनजी कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला ही कार खरेदी करण्यासाठी ६ महिन्याची प्रतीक्षा करावी लागू शकते. टाटा अल्ट्रोझ सीएनजी कार २६ किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये 7.0 इंच स्टायलिश टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी कार इंजिन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Altroz कारमध्ये 1.2 लीटर द्वि-इंधन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 77 bhp पॉवर आणि 97 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही ५ सीटर कार कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी कार किंमत

टाटा अल्ट्रोझ कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.60 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.74 लाख रुपये आहे. अल्ट्रोझ कारच्या XE व्हेरियंटमध्ये सीएनजी पार्याय देण्यात आला आहे. या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.55 लाख रूपये आहे.

टाटा अल्ट्रोझ वैशिष्ट्ये

कारमध्ये शक्तिशाली इंजिनसह स्टार्ट स्टॉप बटण आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम सारखी सुविधा दिली जात आहे. कारमध्ये फॉग लाइट्स आणि पॉवर विंडो देखील उपलब्ध आहेत. व्हॉईस अॅक्टिव्हेटेड सनरूफ आणि उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट्स देखील देण्यात आले आहेत. कारला अधिक आकर्षक बनवण्यासाठी 16 इंच मोठे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.