Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Altroz : वॅगन आरच्या हजार पटीने सुरक्षित आहे टाटाची स्टायलिश कार! 6 लाखात मिळते 5-स्टार सेफ्टी

फॅमिलीसाठी वॅगन आर ५ सीटर हॅचबॅक कार खरेदी करणार असाल तर थांबा, कारण वॅगन आर कारपेक्षा टाटाची जबरदस्त सुरक्षा फीचर्स कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

0

Tata Altroz : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीने त्यांच्या अनेक शानदार कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र तुम्हालाही तुमच्या कुटुंबासाठी वॅगन आर ५ सीटर हॅचबॅक कार खरेदी करायची असेल तर जरा थांबा.

वॅगन आर कारपेक्षा ऑटो मार्केटमध्ये टाटाची हजार पटीने सुरक्षित कार उपलब्ध आहे. कारची किंमत थोडी जास्त असली तरी कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुतीच्या वॅगन आर कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कमी फीचर्स देण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये या कारची 22,080 युनिट्सची विक्री झाली आहे. कारमध्ये पेट्रोल आन इ सीएनजी पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांचा कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मात्र वॅगन आर कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 1 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यावरून तुम्ही देखील ठरवू शकता की तुमच्या कुटुंबासाठी ही कार किती सुरक्षित आहे. त्यामुळे थोडे पैसे खर्च करून तुम्ही टाटाची जबरदस्त सुरक्षा फीचर्स असलेली कार घरी आणू शकता.

टाटा मोटर्सची अल्ट्रोझ हॅचबॅक कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही कार सुरक्षेच्या आणि इतर फीचर्सच्या बाबतीत हजार पटीने पुढे आहे. अल्ट्रोझ कारला सुरक्षेच्या बाबतीत ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. अल्ट्रोझ कारची बिल्ड क्वालिटी उत्तम आहे.

Tata Altroz सुरक्षा

टाटा अल्ट्रोझ कारमध्ये मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. टाटाच्या सर्वच कार मजबूत बिल्ड गुणवत्ता म्हणून ओळखल्या जातात. या कारला क्रश चाचणीमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 5-स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 3-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

Altroz कारमध्ये सुरक्षेसाठी दोन एअरबॅग्ज (ड्रायव्हर आणि पॅसेंजर), चाइल्ड लॉक, चाइल्ड सीटसाठी अँकर पॉइंट, ओव्हरस्पीड वॉर्निंग, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, अँटी थेफ्ट इंजिन इमोबिलायझर, सेंट्रल लॉकिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असे फीचर्स दिले आहेत.

Tata Altroz इंजिन

टाटा मोटर्सने त्यांच्या Altroz कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी असे दोन्ही पर्याय दिले आहेत. तसेच कारमध्ये तीन इंजिन पर्याय देखील उपलब्ध आहेत. पहिले 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, दुसरे 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि तिसरे 1.5-लिटर डिझेल इंजिन कारमध्ये उपलब्ध आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 19.33 Kmpl आणि सीएनजी व्हेरियंट 26.2 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Tata Altroz किंमत

WagonR कारच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते. टाटाची अल्ट्रोझ कार WagonR पेक्षा महाग आहे. अल्ट्रोझ कारच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.60 लाख रुपये आहे. दोन्ही कारच्या बेस व्हेरियंटमध्ये १ लाख रुपयांचा फरक आहे.