Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Altroz Waiting Period : 5-स्टार सेफ्टी रेटिंग आणि किंमत फक्त 6 लाख! टाटाची ही CNG कार खरेदीसाठी करावी लागणार इतकी प्रतीक्षा

टाटा मोटर्सने त्यांची शानदार प्रीमियम हॅचबॅक कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना बाजारात उपलब्ध करून दिली आहे. मात्र कारच्या प्रतीक्षा कालावधीत वाढ झाली आहे.

0

Tata Altroz Waiting Period : देशात वाढत्या महागाईबरोबरच पेट्रोल आणि डिझलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकजण सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. सीएनजी कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने कारचा प्रतीक्षा कालावधी देखील वाढत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक सीएनजी कार सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. त्यांच्या कारची ग्राहकांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता ग्राहकांना CNG कार खरेदीसाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

टाटा मोटर्सची अल्ट्रोझ सीएनजी कारला ग्राहकांची मोठी मागणी आहे. कारचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने ग्राहकांना अल्ट्रोझ सीएनजी कार बुकिंग केल्यापासून काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

तुम्हालाही टाटा मोटर्सची जबरदस्त सुरक्षा फीचर्स असलेली अल्ट्रोझ सीएनजी कार खरेदी करायची असेल तर प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. टाटा अल्ट्रोझ आर खरेदीसाठी ग्राहकांना ६ आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनीने हा नोव्हेंबर २०२३ मधील प्रतीक्षा कालावधी जाहीर केला आहे.

6 आठवडे प्रतीक्षा कालावधी

टाटा मोटर्सने अल्ट्रोझ सीएनजी कारचा प्रतीक्षा कालावधी जाहीर केला आहे. अल्ट्रोझ सीएनजी कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ६ आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. डिलरशिप, रंग पर्याय आणि व्हेरियंटनुसार कारचा प्रतीक्षा कालावधी बदलू शकतो.

Tata Altroz इंजिन पॉवरट्रेन

टाटा मोटर्सने त्यांच्या Altroz प्रीमियम हॅचबॅक कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन दिले आहे. कारचे पेट्रोल इंजिन 85 bhp पॉवर आणि डिझेल इंजिन 89 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.

अल्ट्रोझ कारचे पेट्रोल इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडे आहे तर डिझेल इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. अल्ट्रोझ कारचे सीएनजी मॉडेल 26 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.