Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Best Selling Cars : टाटाच्या या 3 सुरक्षित कार खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड! पहा फीचर्स आणि किंमत

तुम्हालाही कमी बजेटमध्ये सुरक्षित कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी टाटा मोटर्सच्या ३ उत्तम कार बाजारात उपलब्ध आहेत. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Tata Best Selling Cars : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो बाजारातील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या अनेक नवीन कार सादर केल्या जात आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्सच्या तीन स्टायलिश कारला ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे दिसत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक कारचे फेसलिफ्ट मॉडेल किंवा इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात सादर केले जात आहेत. टाटा मोटर्सचे एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये चांगले वर्चस्व आहे.

टाटाच्या खालील कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे

टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सची Nexon ही लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच टाटा मोटर्सने Nexon फेसलिफ्ट कार सादर केली आहे. ही कार सादर करताच एसयूव्ही विक्रीमध्ये नंबर वन बनली आहे. या कारमध्ये पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध आहे. कारमध्ये नवीन टच स्क्रीन सेटअप, टू-स्पोक स्टीयरिंग व्हील देण्यात येत आहे.

Nexon फेसलिफ्ट कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सेकंड स्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर, 6 एअरबॅग्ज, सर्व सीटला ESC अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Tata Punch

टाटा मोटर्स सेगमेंटमध्ये मजबूत पकड निर्माण करण्यासाठी त्यांच्या अनेक कारमध्ये सीएनजी पर्याय देत आहे. अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांची पंच एसयूव्ही कार सीएनजीमध्ये सादर केली आहे. कारची किंमत ६ लाखांपासून सुरु होते. या कारला 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

कारमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि क्रूझ कंट्रोल, EBD सह ABS, रीअर डिफॉगर, रिअर पार्किंग सेन्सर्स, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ISOFIX अँकर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

टाटा अल्ट्रोझ

टाटा मोटर्सकडून त्यांची अल्ट्रोझ कारमध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Altroz कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.59 लाख रुपये आहे. कारमध्ये १.२ लिटर पेट्रोल, १.२ लिटर टर्बो पेट्रोल, १.२ लिटर पेट्रोल-सीएनजी आणि १.५ लिटर डिझेल असे इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.

Altroz हॅचबॅक कारमध्ये सुरक्षेसाठी मागील पार्किंग सेन्सर आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल, ब्रेक स्वे कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.