Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

50 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह घरी आणा Safari पासून Altroz पर्यंत ‘ह्या’ शानदार कार्स; पहा संपूर्ण लिस्ट। Tata Car Discount 2023

लोकप्रिय ऑटो कंपनी टाटा मोटर्स जुलै 2023 मध्ये तिच्या काही लोकप्रिय कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी तब्बल 50 हजारांची बचत करून नवीन कार घरी आणू शकतात.

0

Tata Car Discount 2023 :   जुलै 2023 मध्ये जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो लोकप्रिय ऑटो कंपनी टाटा मोटर्स जुलै 2023 मध्ये तिच्या काही लोकप्रिय कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी तब्बल 50 हजारांची बचत करून नवीन कार घरी आणू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि जुलै 2023 मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्स चक्क Tata Tiago, Altroz, Tigor, Harrier आणि Safari यांच्या सारख्या लोकप्रिय कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ह्या कार्स बाजारात उत्तम सेफ्टी फीचर्ससह भन्नाट मायलेज आणि दमदार इंजिनसह उपलब्ध आहे. यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट कार घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया टाटा मोटर्स जुलै 2023 मध्ये कोणत्या कारवर किती डिस्काउंट देत आहे.

Tata Tiago

कंपनी Tata Tiago या हॅचबॅक कारवर ग्राहकांना  45 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. बाजारात Tata Tiago पेट्रोल, सीएनजी तसेच इलेक्ट्रिक अवतारांमध्ये उपलब्ध आहे. हे जाणून घ्या कि देशातील बाजारात ही कार सर्वात सुरक्षित हॅचबॅकपैकी एक मानली जाते.

Tata Motors फक्त Tiago च्या पेट्रोल आणि CNG व्हर्जनवर सूट देत आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक व्हर्जनचा यात समावेश करण्यात आलेला नाही.  Tiago च्या पेट्रोल व्हेरिएंटवर 20,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. त्याच वेळी, त्याच्या CNG व्हेरिएंटवर 10,000 रुपयांची अतिरिक्त रोख सूट उपलब्ध आहे.

Tata Tigor

कंपनी Tata Tigor च्या  सीएनजी व्हेरियंटवर सवलत देत आहे. ग्राहकांना या कारवर जुलै २०२३ मध्ये  50,000 रुपयांची सूट मिळत आहे. यामध्ये 35,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. सब-कॉम्पॅक्ट सेडानच्या पेट्रोल व्हेरियंटवर टियागोच्या पेट्रोल व्हेरियंटप्रमाणेच सूट मिळते.

Tata Altroz

कंपनी Tata Altroz वर या ऑफर अंतर्गत  28,000 पर्यंत सूट देत आहे. Tata Altroz भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल तसेच सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.  Altroz च्या बेस पेट्रोल व्हेरिएंटवर कंपनी एकूण 23 हजारांची सूट देत आहे. त्याच वेळी, डिझेलसह इतर व्हेरिएंटवर 28 हजार रुपयांचा फायदा दिला जात आहे.

Tata Harrier/ Safari

कंपनी जुलै 2023 मध्ये तिच्या लोकप्रिय एसयूव्ही हॅरियर आणि सफारीवर समान सवलत देत आहे.  या ऑफर अंतर्गत ग्राहकांना दोन्ही एसयूव्ही 35 हजारांच्या सूटसह खरेदी करता येणार आहे.

 

हे जाणून घ्या कि या ऑफरमध्ये कार निर्मात्याने नुकत्याच लाँच केलेल्या रेड डार्क एडिशनचा समावेश नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की या सवलतीच्या ऑफर डीलरशिप, स्थान आणि उपलब्धतेनुसार बदलू शकतात. नवीन कार घेण्यापूर्वी याची जरूर चौकशी करा.