Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Cars Discount : सर्वात सुरक्षित Safari आणि Harrier SUVs वर मिळतेय 1.4 लाख पर्यंत बंपर सूट, असा घ्या लाभ

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सर्वात सुरक्षित कार Safari आणि Harrier SUVs कारवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील नवीन कार खरेदी करून लाखोंची बचत करू शकता.

0

Tata Cars Discount : टाटा मोटर्सकडून त्यांच्या कारवर मोठी सूट दिली जात आहे. तुम्ही देखील या महिन्यात कार खरेदी करून लाखो रुपयांची बचत करू शकता. टाटा मोटर्स ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ग्राहकांना Safari आणि Harrier या दोन एसयूव्ही कारवर 1.4 लाख पर्यंत बंपर सूट देत आहे.

Tata Harrier आणि Safari वर बंपर सवलत

टाटा मोटर्सकडून त्यांच्या कारकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील सर्वात सुरक्षित कारवर लाखो रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्ही देखील टाटा मोटर्सकडून देण्यात येत असलेल्या ऑफरचा लाभ घेऊन 1.40 लाख रुपयांची बचत करू शकता.

टाटा मोटर्सकडून Harrier आणि Safari कारवर देण्यात येत असलेल्या ऑफरमध्ये 75 हजार रुपयांपर्यंत रोख सूट आणि 50 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस तसेच 15 हजार रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

टाटा मोटर्सने अलीकडेच Harrier आणि Safari या दोन एसयूव्ही कारचे फॅसिलिफ्ट मॉडेल सादर केले आहे. मात्र टाटा मोटर्स फक्त त्यांच्या दोन्ही एसयूव्हीच्या प्री-फेसलिफ्ट कारवर ऑफर देत आहे. टाटा मोटर्सकडून या दोन्ही कारचा जुना स्टॉक क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत. टाटा मोटर्स त्यांच्या Harrier आणि Safari फेसलिफ्ट वर कोणतीही सूट देत नाही.

सफारी फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सफारी फेसलिफ्ट कारमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, टच-आधारित HVAC पॅनेलसह ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, नेव्हिगेशन सपोर्टसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असे फीचर्स दिले आहेत.

तसेच सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जर, अॅम्बियंट मूड लाइटिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री सराउंड कॅमेरा, ADAS सुरक्षा फीचर्स देखील दिले जात आहेत.

हॅरियर फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सने त्यांच्या हॅरियर फेसलिफ्ट कारमध्ये मागील विंडो शेड्स, 360 डिग्री कॅमेरा आणि पॅनोरामिक सनरूफ, 7 एअरबॅग्ज, ADAS, हिल होल्ड कंट्रोल, सर्व प्रवाशांसाठी 3 पॉइंट सीट बेल्ट अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

तसेच कारमध्ये 10.25-इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन फोर-स्पोक स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये नवीन ड्राइव्ह सिलेक्टर, रोटरी नॉबसह ड्राईव्ह सिलेक्टरसह डिजिटल डिस्प्ले, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, 10-स्पीकर JBL साउंड सिस्टम असे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.