Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Cars Discount : टाटा मोटर्सकडून सफारी ते हॅरियरपर्यंतच्या कारवर मिळतेय 1.5 लाख रुपयांची बंपर सूट, त्वरित घ्या लाभ

टाटा मोटर्सकडून यावर्षीच्या दिवाळीमध्ये त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कारवर बंपर सूट देण्यात येत आहे. तुम्हीही या महिन्यात कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

0

Tata Cars Discount : देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. अगदी काही दिवसांवर दिवाळी आली आहे. तुम्हीही या दिवाळीमध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर अगदी योग्य आहे. कारण टाटा मोटर्स त्यांच्या अनेक कारवर आकर्षक सूट देत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सफारी ते पंच एसयूव्ही आणि हॅचबॅक कारवर आकर्षक सूट देत आहे. तुम्हीही या महिन्यात कार खरेदी करून 1.5 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. कार खरेदीची एक चांगली संधी आहे.

टाटा टियागो आणि टिगोर डिस्काउंट

टाटा मोटर्सकडून त्यांच्या टियागो आणि टिगोर कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर 55 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये 35,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Tiago आणि Tigor कारच्या जुन्या मॉडेलवर 75 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. टियागो आणि टिगोर कारच्या जुन्या मॉडेल कारच्या ऑफरमध्ये 50 हजार रुपयांची रोख सूट, 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत म्हणून 5 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे.

टाटा हॅरियर/सफारी Discount ऑफर

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची हॅरियर आणि सफारी facelift कार लाँच केली आहे. या कारमध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून दोन्ही एसयूव्ही कारवर 1.4 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे. या ऑफरमध्ये 75 हजार रुपयांची रोख सूट, 50 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 15 हजार रुपयांचा कॉर्पोरेट सुटचा समावेश आहे.

टाटा पंच आणि अल्ट्रोझ डिस्काउंट ऑफर

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच एसयूव्ही कारवर देखील शानदार ऑफर देण्यात येत आहे. पंच कारवर देण्यात येत असलेल्या ऑफरमध्ये 5 हजार ते 10 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.

तसेच टाटा मोटर्सकडून दिवाळीमध्ये अल्ट्रोझ कारवर 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस म्हणून एकूण 35,000 हजार रुपयांची बंपर सूट देण्यात येत आहे.