Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Cars Waiting Period : टाटाच्या Tiago आणि Tigor कार खरेदी करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा…

टाटा मोटर्सने त्यांच्या शानदार पेट्रोल आणि सीएनजी कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. टाटाच्या या कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

0

Tata Cars Waiting Period : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या दमदार सुरक्षित कार सादर केल्या आहेत. त्यांच्या कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. टाटाच्या कार सुरक्षित कार म्हणून ओळखल्या जात आहेत.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सर्वच कारमध्ये दमदार इंजिन आणि जबरदस्त सुरक्षा फीचर्स दिले आहेत. ग्राहक देखील टाटाच्या सुरक्षित कारचा पर्याय निवडत आहेत. टाटाच्या कारला बाजारात प्रचंड मागणी असल्याने कारचा प्रतीक्षा कालावधी देखील वाढला आहे.

टाटा मोटर्सचे सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये वर्चस्व आहे. तसेच सीएनजी कारच्या मागणीत वाढ होत असताना टाटाने त्यांच्या अनेक सीएनजी कार देखील सादर केल्या आहेत. मात्र या कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

टाटा टियागो

टाटा मोटर्सने त्यांची टियागो कार पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. XE, XT (O), XT, XT रिदम आणि XZ Plus अशा पाच व्हेरियंटमध्ये टियागो कार सादर करण्यात आली आहे.

या कारचे पेट्रोल व्हेरियंट खरेदी करण्यासाठी 3 ते 4 आठवडे वाट पाहावी लागत आहे. तर टियागो सीएनजी कार खरेदीसाठी ६ ते ८ आठवडे प्रतीक्षा करावी लागत आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.60 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.15 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

टाटा Tigor

टाटा मोटर्सची Tigor हॅचबॅक कार देखील कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे. Tigor कार XE, XM, XZ, XZ Plus आणि XZ Plus अशा पाच व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. Tigor कारचे पेट्रोल व्हेरियंट खरेदीसाठी तीन ते चार आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तर Tigor कारचे सीएनजी व्हेरियंट दोन ते चार आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय उपलब्ध आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी आणि सीएनजी व्हेरियंट फक्त 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.30 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.95 लाख रुपये आहे.