Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Curvv SUV : ह्या दिवशी लॉन्च होणार टाटाची पहिली Coupe SUV ! Creta, Grand Vitara, Seltos, Taigun, Kushaq ची होणार सुट्टी

टाटा मोटर्सकडून आणखी जबरदस्त एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. या नवीन एसयूव्ही कार Curvv संकल्पनेवर आधारित असणार आहेत. तसेच कारचा प्लॅटफॉर्म देखील वेगळा असणार आहे.

0

Tata Curvv SUV : टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक नवनवीन एसयूव्ही कार बाजारात सादर केल्या जात आहेत. तसेच टाटाच्या एसयूव्ही कारला बाजारात चांगली मागणी देखील आहे. एसयूव्ही कारची वाढती मागणी पाहता टाटाकडून नवनवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत.

बाजारात एसयूव्ही कारच्या मागणी वाढत होत असताना टाटा मोटर्सकडून आगामी काळात आणखी नवीन एसयूव्ही कार सादर केल्या जाणार आहेत. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या एसयूव्ही कारला टाटाच्या नवीन एसयूव्ही टक्कर देऊ शकतात.

टाटा मोटर्सकडून नुकतीच कर्व्ह संकल्पनेतून त्यांची Nexon फेसलिफ्ट कार लॉन्च केली आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. टाटाकडून एप्रिल 2022 मध्ये त्यांच्या Curvv इलेक्ट्रिक SUV संकल्पना सादर केली होती.

जानेवारी 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटाने Curvv सेगमेंट एसयूव्हीचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले होते. टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले आहे की 2024 च्या सुरुवातीला त्यांची Curvv coupe SUV भारतीय ऑटो बाजारात सादर केली जाऊ शकते.

टाटा मोटर्सकडून आगीदारच सांगण्यात आले आहे की, coupe SUV कार 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन पर्यायसह सादर केली जाणार आहे. कंपनीकडून यावर वेगाने काम सुरु आहे. coupe SUV मधील टर्बो पेट्रोल हे Tata Motors चे सर्व-नवीन इंजिन असेल आणि नवीन SUV मध्ये देखील पदार्पण करेल.

टाटा मोटर्सकडून अलीकडेच ‘टाटा फ्रेस्ट’ कारच्या नावाचा ट्रेडमार्क दाखल केला आहे. टाटाकडून त्यांच्या नवीन एसयूव्ही कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स जोडले जाऊ शकतात. परिपूर्ण फीचर्सने सुसज ही कार २०२४ च्या सुरुवातीच्या पहिल्या ३ महिन्यात सादर केली जाऊ शकते.

टाटा मोटर्सच्या नवीन Curvv एसयूव्ही कारची लांबी 4.3 मीटर असेल. ही कार बाजारात दाखल होताच Hyundai Creta, Kia Seltos, MG Astor, Skoda Kushaq, Volkswagen Taigun, Maruti Grand Vitara, Toyota Hyryder आणि Honda Elevate या एसयूव्ही कारशी स्पर्धा करेल.